ऑफ-बिट : ‘आयपीएल’मधील वेगाचा थरार...
06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
आयपीएल’ ही जरी फलंदाजांची स्पर्धा असली, तरी आजवर अनेक वेगवान गोलंदाजांनी त्यात जीव तोडून आग ओकलीय आणि आपली दहशत निर्माण करण्याबरोबर प्रतिस्पर्ध्यांचा कणा मोडून टाकण्यात मोलाची भूमिकाही बजावलीय...पण त्यापैकी सर्वांत वेगवान ते कोण हे माहीत आहे ?...त्यावरच टाकलेली ही नजर...
Advertisement
- ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये जगातील काही नावाजलेल्या वेगवान गोलंदाजांनी आपला कमाल वेग दाखवलाय. परंतु 2011 मध्ये शॉन टेटनं ताशी 157.71 किलोमीटर वेगानं केलेला मारा हा वैशिष्ट्यापूर्ण. त्यापेक्षा जास्त वेगानं चेंडू कुणालाही टाकता आलेला नाही...
- राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व करताना ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजानं सदर विक्रमी वेगाचा चेंडू टाकला तो सहकारी आरोन फिंचला. त्यावेळी फिंच ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’तर्फे (आताचा ‘दिल्ली कॅपिटल्स’) खेळत होता...12 एप्रिल, 2011 रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला...या ऑस्ट्रेलियन खेळाडूनं त्याच्या शेवटच्या षटकातही ताशी 150 किलोमीटरांपेक्षा जास्त वेगानं दोन चेंडू टाकले. एक इरफान पठाणला आणि दुसरा रोएलॉफ व्हॅन डेर मर्वेला...
- आयपीएल, 2022 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन शॉन टेटचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्यानं त्यावेळी गुजरात टायटन्सकडून राजस्थान रॉयल्सविऊद्ध चेंडू टाकला होता तो ताशी 157.3 किलोमीटर गतीनं...
- उमरान मलिकनं 2022 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध ताशी 157 किलोमीटर वेगानं चेंडू टाकत ‘आयपीएल’मधील सर्वांत वेगवान भारतीय गोलंदाज ठरण्याचा पराक्रम केला...उमराननं त्या हंगामात 22 बळी घेतले आणि लवकरच त्याला भारतीय संघाचीही दारं खुली झाली. उमरान मलिक हा ‘आयपीएल’मध्ये ताशी 150 किलोमीटरांपेक्षा पेक्षा जास्त वेगानं चेंडू टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज...
- लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मयंक यादवनं आयपीएल, 2024 मध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्ध ताशी 156.7 किलोमीटर वेगानं चेंडू टाकून भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं. त्याच्याही गतीचा भरपूर गाजावाजा झाला होता, पण त्याला दुखापतींनी गारद केलं...
- यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत सर्वांत वेगवान चेंडू टाकलाय तो पंजाब किंग्सतर्फे खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसननं. स्पर्धेच्या सुऊवातीच्या टप्प्यातील लखनौ सुपर जायंट्सविऊद्धच्या सामन्यात त्यानं ताशी 153.2 किलोमीटर वेगानं मारा केला...
- राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा आर्चर आणि गुजरात टायटन्सचा कागिसो रबाडा हे ताशी 150 किलोमीटर वेगाचा टप्पा ओलांडणारे इतर गोलंदाज. त्यांना नंतर येऊन मिळाले ते कोलकाता नाईट रायडर्सचा अॅनरिच नोर्त्झे आणि गुजरातचा प्रसिद्ध कृष्णा. या हंगामात सदर स्तर गाठणारा कृष्णा हा एकमेव भारतीय गोलंदाज...
Advertisement