For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओल्ड गोवा फेस्तसाठी आलेल्या शेजारी राज्यातील पदयात्रेचे

01:01 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
ओल्ड गोवा फेस्तसाठी आलेल्या शेजारी राज्यातील पदयात्रेचे
Advertisement

माशेल येथे भव्य स्वागत भाविकांची मागील 31 वर्षापासून अखंडित सेवा

Advertisement

वार्ताहर /माशेल

जुने गोवा येथील जगप्रसिद्ध सेंट फान्सिस झेवियर यांचे फेस्तानिमित्त शेजारील राज्य कर्नाटक, महाराष्ट्रातून शेकडो भाविक पायपीट करत हजर राहण्यासाठी पोचलेल्या पदयात्रेचे माशेल येथे भव्य स्वागत करण्यात आले. सांगरगल्ली खानापूर बेळगांव डेंगराळ भागाच्या वाघ्र क्षेत्र पार करीत मागील 31 वर्षापासून सेन्ट फ्रान्सिस झेवियर्स ओल्ड गोवा फेस्तासाठी भाविक पायी चालत येण्याची परंपरा आजही कायम राखलेली आहे. पाच दिवस पायी चालत येणाऱ्या या पदयात्रेत यंदा 90-100 भाविक सहभागी झाले आहेत. सांगरगल्लीहून सुरू झालेली ही पदयात्रा शनिवारी रात्री माशेल येथील चर्चमध्ये पोचली. पदयात्रेत सुमारे 90-100 भाविक खानापूर, संघरगारी, बेळगावीहून अंदाजे 120-30 कि.मी. चालत रात्री माशेल येथील चर्च जवळ पोचली. तिथे माशेल चर्चचे फादर जॉन फर्नाडीस तसेच माजी सरपंच तथा विद्यमान पंच फ्रान्सिस लोबो यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.

Advertisement

फ्रान्सिस लोबो यांनी यात्रींच्या रात्रीच्या मुक्कामाची व जेवणाची तसेच सकाळी नाश्त्याची व्यवस्था केली. या पदयात्रेतील एक प्रमुख मायकल फर्नाडीस यांनी सांगितले की या पदयात्रेत आता मोठ्या प्रमाणात युवकही सामिल होत आहेत. सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी श्रद्धेनिशी या पदयात्रेत सहभागी होत असतात. मोठ्या प्रमाणात महिला तसेच सिस्टरही या गटात सहभागी आहेत. यावेळी बोलताना फ्रान्सिस लोबो म्हणाले की संगरगल्ली खानापूर डोंगराळ भागातून ही मंडळी सेंट झेवियर फेस्तासाठी गोव्यात चालत येतात. या भाविकांची मला सेवा करण्याची संधी मिळते याबद्दल त्याचे आभार व्यक्त केले. त्यांची पदयात्रा अशीच चालू ठेवावी व आणखीन युवकांनी या पदयात्रेत सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळावे असे आवाहन केले.फादर बेनेतो फर्नाडीस यांनी माशेल चर्चचे फादर जोकीस  फर्नाडीस तसेच फ्रान्सिस लोबो यांचे आभार मानले. ही पदयात्रा भविष्यातही अशीच चालू राहणार असे सांगितले.

Advertisement
Tags :

.