For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओडिशाचे मुख्यमंत्री माझी गुजरात दौऱ्यावर

06:43 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओडिशाचे मुख्यमंत्री माझी गुजरात दौऱ्यावर
Advertisement

राज्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी गुरुवारपासून गुजरातचा तीन दिवसीय दौरा सुरू केला. या दौऱ्याचा उद्देश राज्यासाठी गुंतवणूक आकर्षित करणे आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उद्योगमंत्री संपत चंद्र स्वाइन आणि वरिष्ठ अधिकारी आहेत. हा दौरा गुजरातच्या अनेक शहरांना व्यापणार आहे.

Advertisement

मजबूत पायाभूत सुविधा आणि कुशल कार्यबळासोबत ओडिशा एक पसंतीचे गुंतवणूक स्थळ ठरले आहे. गुजरातचा हा दौरा राज्याच्या लोकांसाठी नव्या संधी निर्माण करेल आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करेल अशी अपेक्षा आहे. आम्ही या तीन दिवसीय दौऱ्याला 2036 पर्यंत समृद्ध ओडिशासाठी गुंतवणूक आकर्षित करणे आणि उद्योग भागीदारांना ओडिशाच्या विकास यात्रेचा हिस्सा करण्यासाठी मैलाचा दगड मानतो असे मुख्यमंत्री माझी यांनी म्हटले आहे. माझी हे अहमदाबादमध्ये एका गुंतवणूक विषयक रोड शोमध्ये सामील झाले आहेत. तसेच उद्योजकांसोबत त्यांची चर्चा झाली आहे.

Advertisement
Tags :

.