For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओलमणी-जांबोटी परिसरात वळीव पावसाची हजेरी

10:18 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओलमणी जांबोटी परिसरात वळीव पावसाची हजेरी
Advertisement

वार्ताहर /जांबोटी

Advertisement

जाबोटी-ओलमणी परिसरात शुक्रवारी दुपारी अचानकपणे वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला होता. ढगाळ वातावरण तसेच उष्म्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. वातावरणात झालेल्या बदलामुळे दोन-तीन दिवसात पाऊस होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अपेक्षाप्रमाणे शुक्रवारी दुपारी मेघगर्जनेसह या परिसरात वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच या हंगामातील पहिलाच पाऊस असल्यामुळे पावसामुळे काही प्रमाणात नागरिकांची तारांबळ उडाली. ओलमणी येथे गटारी तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून दुर्गंधी पसरली होती. हा पाऊस शेती मशागतीच्या दृष्टीने कुचकामी ठरला आहे. पावसामुळे काजू उत्पादनाला काही प्रमाणात पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र रखडलेली शेतीची कामे व ऊस, मिरची आदी उन्हाळी पिकांना जीवदान मिळण्यासाठी या भागातील शेतकरी वर्ग दमदार वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.