महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चोर्ला रस्त्याचे भूमिपूजन होऊनही वनखात्याची अडवणूक

10:22 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

Advertisement

चोर्ला गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून रामेश्वर मंदिरपर्यंतच्या आठशे मीटर रस्त्यापैकी दोनशे मीटर रस्त्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे भूमिपूजन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. परंतु वनखात्याने रस्ताकामाला अडवणूक केली आहे. यावेळी लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, पारवाड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष भिकाजी गावडे, महादेव गावकर, प्रकाश गुरव, अशोक गावकर, पवन गायकवाड, दौलत कोलीकर व चोर्ला गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी चोर्ला ग्रामस्थांतर्फे आमदार हलगेकर यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

 रस्त्याला विरोध

बेळगाव-चोर्ला-पणजी या मुख्य रस्त्यापासून चोर्ला गाव ते रामेश्वर मंदिरपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण तत्कालीन माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या कार्यकाळामध्ये झाले होते. परंतु या भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सदर रस्ता उखडून गेल्याने पुन्हा या रस्त्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी निधी मंजूर केला. परंतु कणकुंबी वलय अरण्य अधिकाऱ्यांनी त्या रस्त्याच्या डांबरीकरणास विरोध केला असून रीतसर ऑर्डर घेऊन या. त्यानंतरच रस्ताकामाला सुरुवात करा, असे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले आहे. जर वनाधिकाऱ्यांनी रस्त्याला विरोध केला तर बेळगाव-चोर्ला-पणजी अशी वाहतूक चोर्ला या ठिकाणी रास्ता रोको करून वनखात्याचा निषेध केला जाईल, असा इशारा चोर्लाचे युवा कार्यकर्ते रविंद्र म्हाजीक यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article