महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताच्या निवडणुकीत अमेरिकेकडून अडथळे : रशिया

07:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतासंबंधीची अमेरिकेची जाणीव कमकुवत : पन्नूप्रकरणी निराधार आरोप

Advertisement

वृत्तसंस्था /मॉस्को

Advertisement

अमेरिका भारताच्या लोकसभा निवडणुकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. अमेरिका गुरपतवंत सिंह पन्नूप्रकरणी निराधार आरोप करत भारताचा अपमान करत असल्याचा दावा रशियाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी केला आहे. पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप बिनबुडाचा असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. पन्नू हा भारतासाठी वाँटेड दहशतवादी असून तो अमेरिका तसेच कॅनडाचे नागरिकत्व मिळवून आहे. पन्नूच्या हत्येच्या कटात सामील होता हे सिद्ध करणारे पुरावे अमेरिकेने अद्याप सादर केलेले नाहीत. याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाचा आरोपही भारतासंबंधी अमेरिकेची कमकुवत जाणीव दर्शवित असल्याचे रशियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिका अशाप्रकारचे आरोप करून एक सार्वभौम देश म्हणून भारताचा अपमान करत आहे. भारतच नव्हे तर आणखी अनेक देशांच्या विरोधात धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाचा निराधार आरोप अमेरिकेकडून करण्यात येतो. अमेरिकेची ही कृती स्पष्ट स्वरुपात भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेपाचा पुरावा असल्याचे रशियाने सुनावले आहे. अमेरिकेने यापूर्वी रशियावर निष्पक्ष निवडणूक न करविण्याचा आरोप केला होता. रशियात 15-17 मार्चदरम्यान सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यात ब्लादिमीर पुतीन यांना 88 टक्के मते मिळाली आणि ते पाचव्यांदा रशियाचे राष्ट्रपती झाले. पुतीन हे रशियात कुठल्याही विरोधी नेत्याला टिकू देत नसल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

परस्परांवर हस्तक्षेपाचे आरोप

अमेरिका आणि पाश्चिमात्य देश स्वत:च्या निवडणुकांमध्ये रशिया तसेच चीनकडून हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप करत असतात.  2021 मध्ये अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात पुतीन यांनी ट्रम्प यांना लाभ मिळवून देण्यासाठी अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याच्या मोहिमेला मंजुरी दिल्याचा दावा करण्यात आला होता. तर त्यापूर्वी 2016 च्या अमेरिकेच्या निवडणुकीतही रशियावर हस्तक्षेपाचे आरोप झाले होते. याप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनीच पुतीन यांना लक्ष्य केले होते. यानंतर रशियाने अमेरिकेतील स्वत:चा राजदूत परत बोलाविला होता. अमेरिकेच्या निवडणुकीत चीनच्या हस्तक्षेपाचे पुरावे मिळाल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनीच सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article