महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसकडून हरियाणासाठी निरीक्षक

06:34 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ निरीक्षक म्हणून राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीतील नेते अजय माकन आणि ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांची नियुक्ती केली आहे. या राज्यात 5 ऑक्टोबरला सर्व 90 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष या राज्यातील मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष आहेत.

Advertisement

काँग्रेसने या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी युती केली असून या पक्षासाठी भिवानीची एक जागा सोडली आहे. काँग्रेसने स्वत: 89 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला असून या सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवारांची नावेही घोषित केली आहेत. आम आदमी पक्षही या निवडणुकीत पूर्ण सामर्थ्यानिशी उतरणार असून या पक्षाने आतापर्यंत 60 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय राष्ट्रीय लोकदल, जननायक जनता पक्ष आणि इतर काही स्थानिक पक्षही या निवडणुकीत सहभागी होत आहेत. तथापि, मुख्य संघर्ष भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article