For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Hupuri crime news - हुपरीत अल्पवयीन मुलीकडे अश्लील हावभाव; आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

01:27 PM Feb 23, 2026 IST | NEETA POTDAR
hupuri crime news   हुपरीत अल्पवयीन मुलीकडे अश्लील हावभाव  आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा
Advertisement

                                 हुपरीत तरुणाची घृणास्पद कृत्ये;

Advertisement

हुपरी- अल्पयीन मुलीकडे पाहत अश्लील हावभाव करत मुलीच्या मनाला लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात राहुल तुकाराम शिंदे ( वय २५ ) याच्या विरोधात पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. हुपरी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हाखाली अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार संशयित राहुल शिंदे हा अल्पयीन मुलीच्या घराजवळ मागील दोन महिन्यांपासुन तिला पाहुन गॅलरीत येऊन हातवारे करुन अश्लील चाळे करत होता. या संबधीचा व्हीडिओ देखील तक्रारदाराने पोलिसात सादर केला आहे.

मुलीच्या बंगल्यावरील सीसीटीव्हीत सुद्दा हा आरोपी वारवांर अश्लील चाळे करत असलेचे कैद झाले आहे. संशयित आरोपी वांरवांर अश्लील चाळे करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय व्यवस्था आणि बालकांचे लैगिक अपराधांपासुन संरक्षण २०१२च्या कायद्यानुसार (पॉक्सो गुन्हा ) दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे तपास करीत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.