महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘कॅन्टोन्मेंट’च्या नामांतरणाला आक्षेप

12:15 PM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युवा समितीचा पुढाकार

Advertisement

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामांतरण करण्यात येणार आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट या नावासोबत अनेक ऐतिहासिक संदर्भ जोडले असून त्यासोबत नागरिकांच्या आठवणी निगडित आहेत. सीमाप्रश्नाचा खटला अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून जोवर या खटल्याचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामांतर करू नये, असा आक्षेप म. ए. युवा समितीने नोंदविला आहे. काही दिवसांपूर्वीच कॅन्टोन्मेंट बोर्डने ‘बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड’चे ‘बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड’ असे नामांतर करण्याबाबत वृत्तपत्रातून नोटीस दिली होती. या नामांतरणाला आक्षेप नोंदविण्यासाठी नोटीस आल्यापासून 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती.

Advertisement

स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठा लाईट इन्फंट्री बेळगावमध्ये असून ती कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अंतर्गत येते. कॅन्टोन्मेंटमध्ये अधिकाधिक मराठी भाषिक आहेत. तसेच बेळगावच्या सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे नामांतर करणे चुकीचे ठरणार आहे. निकाल लागेपर्यंत नामांतर करण्यासाठीचा निर्णय घेऊ नये, असे आक्षेपात स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवार दि. 3 जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी अधिकाधिक नागरिकांनी आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन युवा समितीने केले आहे. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, श्रीकांत कदम, विनायक कावळे, सूरज कुडूचकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article