कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

12:37 PM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनचा पदग्रहण समारंभ मंगळवारी पार पडला. अध्यक्षपदी सतीश तेंडोलकर,उपाध्यक्षपदी मुकेश संघवी व राजू पालिवाला, सेक्रेटरी मुकेश खोडा, सहसेक्रेटरी कमलेश खोडा, खजिनदारपदी लालचंद छाप्रू व सहखजिनदारपदी नितेश जैन यांची निवड करण्यात आली होती. या सर्व पदाधिकाऱ्यांनी पद्भार स्वीकारला. असोसिएशनचे माजी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांनी नूतन अध्यक्षांकडे सूत्रे प्रदान केली. हॉटेल आदर्श पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमाला क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष सतीश तेंडोलकर म्हणाले, बेळगाव हे कापड, साडी, सूत आणि हातमाग उद्योगांसाठी देशातील एक जुने केंद्र आहे. येथील व्यापाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून सर्वोत्तम व्यवसाय करून बेळगावला कापड बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवून दिला आहे. त्यामुळेच आसपासच्या राज्यांतील नागरिक खरेदीसाठी बेळगावमध्ये येत असतात.

Advertisement

कापड उद्योगामुळे बेळगावमधील इतर व्यवसायांनाही हातभार लागत आहे. बेळगाव शहराचा विचार करता शहराच्या एकूण दरडोई उत्पन्नापैकी (जीडीपी) 65 टक्के उत्पन्न कापड व्यवसायातून मिळते. शहरातील 70 टक्क्यांहून अधिक दुकाने कापड व्यवसायाशी निगडीत आहेत. या व्यवसायाने बेळगावमधील 35 टक्क्यांहून अधिक नागरिकांना रोजगार देऊन औद्योगिक क्षेत्राशी बरोबरी केली आहे. शहरातील काही समस्या दूर करून या व्यवसायाला अजून सुसज्ज करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे तेंडोलकर यांनी सांगितले. यावेळी किशोर तोलानी, नवरत्न वोहरा, मोहनलालजी वोहरा, रमेश भंडारी, रमेश जैन यासह इतर सदस्य उपस्थित होते. मुकेश खोडा यांनी आभार मानले. यावेळी शहरातील क्लॉथ मर्चंट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article