हे गणराया कर्नाटकाला सुबुद्धी दे!
डॉ. किरण ठाकुर यांची आर्त विनवणी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रŽ न्याय मार्गाने सुटावा
सांगली : सीमाभागातील मराठी जनतेवर अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायातून त्यांची सुटका व्हावी आणि त्या भागातील लोकांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी ‘हे गणराया, कर्नाटकला सुबुद्धी दे!“ अशी आर्त विनवणी तरुण भारत समूहाचे सलागार संपादक आणि लोकमान्य मल्टिपर्पजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी केली. मंगळवार, दि. 7 एप्रिल रोजी त्यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त आणि अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सांगलीतील आराध्य दैवत श्री गजानन चरणी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
सीमाभागातील सुमारे 865 मराठी गावे कर्नाटकच्या अधिपत्याखाली गेल्याचा उलेख करत ठाकुर म्हणाले की, गेली 60 वर्षे हा सीमालढा सुरू आहे. अनेक मराठी बांधवांनी या संघर्षात प्राण गमावले, तरीही न्याय मिळालेला नाही. ‘हा अन्याय संपविण्यासाठी आवश्यक ती ताकद महाराष्ट्राकडून दिसत नाही. त्यामुळे कर्नाटकचे वर्चस्व वाढत आहे. मराठी माणूस आता या जोखडातून मुक्त होण्यासाठी आसुसला आहे,“ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच गणरायाच्या चरणी साकडं घालत, कर्नाटकला सबुद्धी मिळावी आा†ण सीमावादाचा प्रश्न न्याय मार्गाने सुटावा, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
उत्साहात वाढदिवस साजरा
किरण ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त गणपती पंचायतन संस्थानतर्फे गणेश वंदना करण्यात आली. गुरुजींच्या हस्ते त्यांना आशीर्वाद देण्यात आले. त्यांच्या दीर्घायुष्याची आणि मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली. त्यानंतर राजा विजयसिंह पटवर्धन भवन येथे त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी त्यांना भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सुवासिनींनी औक्षण करून सांगलीच्या गणपतीची मूर्ती भेट देत सन्मान करण्यात आला. आपल्या उत्तरपर भाषणात ठाकुर यांनी जीवनप्रवास उलगडताना बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘लहानपणी मी खूप जाड होतो, पेढ्यांनी तुला करताना आईची दमछाक व्हायची,“ असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लकेर निर्माण केली. त्याचबरोबर वडिलांकडून मिळालेल्या समाजसेवेच्या संस्कारांचा उलेख करत, ‘अन्यायाविऊद्ध झुंज हे ब्रीद घेऊन 107 वर्षांची परंपरा असलेला तरुण भारत आजही लढत आहे,“ असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला लोकमान्य संस्था व तरुण भारतचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत संपादक शिवराज काटकर यांनी केले, तर आभार पत्रकार विनायक जाधव यांनी मानले.
हा माझा घरचा सत्कार
तऊण भारत परिवाराकडून झालेला सत्कार हा घरच्यांसारखा असल्याची भावना वक्त करत, ‘या सन्मानामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो,’ असे डॉ. किरण ठाकुर म्हणाले.
डॉ. किरण ठाकुर यांना अभीष्टचिंतन
गोवा आवृत्तीच्या जडणघडणीत मोठा वाटा : सागर जावडेकर
गोव्यात तरुण भारतला अग्रस्थान मिळवून देण्यासाठी डॉ. किरण ठाकुर यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी अनेक वंचितांचा आवाज बनून गोव्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला, असे मत गोवा संपादक सागर जावडेकर यांनी व्यक्त केले.
सीमालढ्याचा बुलंद आवाज : प्रवीण काळे
मुंबईत सीमाप्रश्नवर ठोस भूमिका घेऊन जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम डॉ. किरण ठाकुर यांनी केले. त्यामुळे ‘सीमालढा’ म्हटले की डॉ. किरण ठाकुर आणि तऊण भारत हे नाव पुढे येते, असे मुंबई मुख्य प्रतिनिधी प्रवीण काळे यांनी सांगितले.
प्रत्येक पत्रकारांना भक्कम पाठबळ : प्रशांत चव्हाण
तरुण भारतमधील प्रत्येक पत्रकारामागे किरण ठाकुर यांचे भक्कम पाठबळ असल्यानेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद निर्माण झाली आहे, असे पुणे विभाग प्रमुख प्रशांत चव्हाण यांनी नमूद केले.
मराठी युवकांना उभारी : गजानन धामणेकर
बेळगावसह सीमाभागातील मराठी युवकांना उभारी देण्यात डॉ. किरण ठाकुर यांचा मोठा वाटा आहे, असे लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर यांनी सांगितले.
लोककल्पमधून समाजोपयोगी उपक्रम : नाईक
लोककल्प संस्थेच्या माध्यमातून वाचन, कला, नाट्या आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत, असे संस्थेचे संचालक नाईक यांनी नमूद केले.
लोकमान्यचा झपाट्याने विस्तार : सुदत्त पाठक
सांगली विभागात अल्पावधीतच 500 कोटींच्या ठेवींचा टप्पा गाठला असून, ठाकुर यांच्या प्रेरणेने लोकमान्यने 11 हजार कोटींचा आकडा पार केला आहे, अशी माहिती विभागीय प्रमुख सुदत्त पाठक यांनी दिली.