न्यूझीलंडचे पंतप्रधान 'क्रिस्टोफर लक्सन','बॉलीवूड'च्या कलाकारांची खास भेट
मुंबई
आमिर खान, विद्या बालन, आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ रॉय कपूर यांनी न्युझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची भेट घेतली. न्युझीलंडचे पंतप्रधान लक्सन भारत दौऱ्यावर असताना ही खास भेट आयोजित करण्यात आली होती. या खास भेटीबद्दल पंतप्रधान क्रिस्टोफर यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे.
या बैठकीत भारतीय चित्रपट इंडस्ट्री आणि न्यूझीलंडमधील संबंध दृढ करण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच सिनेमांच्या चित्रीकरणांसाठी न्युझीलंड चा प्रामुख्याने विचार केला जावा, यावरही चर्चा करण्यात आली.
तसेच या भेटीत पंतप्रधान लक्सन म्हणाले, की चित्रपटामधील एखाद्या सीनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा येतो, ज्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात उत्पन्न वाढते. हे मला जास्त प्रमाणात होताना पाहायचे आहे. बॉलीवूडमधील काही स्टार्स ना भेटून आपण आणखी का करू शकतो यावर चर्चा करता आली. तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला.