For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनव्हीएस-03, जीसॅट-1ए प्रक्षेपणासाठी सज्ज

06:09 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
एनव्हीएस 03  जीसॅट 1ए प्रक्षेपणासाठी सज्ज
Advertisement

सरकारकडून हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा : सैन्य कार्यासाठी होणार उपग्रहांचा वापर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अंतराळात स्वत:ची शक्ती सातत्याने वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. याचनुसार दोन रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण उपग्रह एनव्हीएस-03 आणि जीसॅट-1ए प्रक्षेपणासाठी तयार आहेत. हे उपग्रह अनेक आठवड्यांपासून श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवर प्रक्षेपणासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहेत. या दोन्ही उपग्रहांचा वापर विशेष स्वरुपात सैन्य कार्यांसाठी होणार आहे.

Advertisement

या उपग्रहांसोबत जीएसएलव्ही-एमके-2 प्रक्षेपकही प्रक्षेपणासाठी तयार आहे. परंतु अद्याप प्रक्षेपणाची मंजुरी न मिळाल्यामुळे प्रोपेलेंट भरण्याचे काम निम्म्यावरच रोखण्यात आले होते.

स्पेसपोर्टवर प्रक्षेपणासाठी तयार

सरकारने अद्याप दोन पीएसएलव्ही मिशनवरून माहिती दिलेली नसताना हा विलंब होत आहे. यातील एक 18 मे 2025 आणि दुसरा 12 जानेवारी 2026 रोजी समोर आला होता. परंतु या मोहिमांच्या अपयशाविषयी विस्तृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही, यामुळे भारताचा प्रक्षेपण कार्यक्रम मंदावला आहे.

एनव्हीएस-03, जीसॅट-1ए महत्त्वपूर्ण

प्रक्षेपणासाठी तयार एनव्हीएस-03 उपग्रह अत्यंत खास आहे. हा भारताच्या दुसऱ्या पिढीच्या नाविक नेव्हिगेशन कॉन्स्टेलेशनचा पुढील उपग्रह आहे. तर जीसॅट-1ए एक अत्याधुनिक जियो-इमेजिंग उपग्रह असून तो भारतीय भूमीवर जवळपास रियल-टाइम नजर ठेवण्यास सक्षम आहे. दोन्ही उपग्रहांनी प्रक्षेपणापूर्वीची बहुतांश तयारी पूर्ण केली असून उ•ाणासाठी सज्ज आहेत.

का ताटकळतेय प्रक्षेपण...

-प्रक्षेपणातील हा अडथळा इस्रोसाठी एका अवघड वर्षानंतर आला आहे.

-12 जानेवारी रोजी पीएसएलव्ही-सी62 तिसऱ्या टप्प्यात गडबड झाल्याने स्वत:च्या पेलोडला ऑर्बिटमध्ये स्थापिन करण्यास अपयशी ठरला.

-त्याच्या आठ महिन्यांपूर्वी पीएसएलव्ही-सी61 देखील अपयशी ठरला होता, यामागे इस्रोने केवळ पीएस3 मध्ये प्रेशर ड्रॉप कारणीभूत राहिल्याचे सांगितले.

-पीएसएलव्ही-सी62 मिशनच्या अपयशाचे विश्लेषण करणाऱ्या समितीने गडबड होण्यामागील कारण शोधले असले तरीही निष्कर्ष सार्वजनिक केलेले नाहीत.

-पीएसएलव्हीशी संबंधित ही खबरदारी विभागाच्या आतील लोकांनाही गोंधळात टाकत असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :

.