For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॉम्प्युटर निर्मितीत एनव्हिडीयाची एंट्री

06:22 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॉम्प्युटर निर्मितीत एनव्हिडीयाची एंट्री
Advertisement

चिप बनवणाऱ्या मोठ्या जागतिक कंपनीचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था,नवी दिल्ली

जगातील सर्वात मोठी एआय चिप बनवणारी कंपनी एनव्हिडीया आता लवकरच कॉम्प्युटर निर्मितीत उतरणार असल्याची माहिती आहे. कंपनी मुख्यत: मोठ्या डेटा सेंटर व कृत्रिम बुद्धिमतेशी (एआय)संबंधीत कामांसाठी लागणाऱ्या वेगवान चिप्स बनवते. पण आता कंपनी सामान्यांसाठी उपयोगात येणारा पर्सनल कॉम्प्युटर अर्थात पीसी बनवण्याच्या क्षेत्रात उतरणार आहे.

Advertisement

कंपनीने आपला नवा एआरएम आधारीत प्रोसेसर एनआयएक्स सादर केला आहे. तैवानमध्ये कॉम्प्युटर शो कॉम्प्युटेक्समध्ये कंपनीचे सीईओ जेन्सन हुआंग यांनी एआयएक्सचे सादरीकरण केले आहे. ही चिप मायक्रोसॉफ्टसोबत तयार करण्यात आली असून वर्षाअखेर नव्या विंडोव्ह लॅपटॉप व डेस्कटॉपमध्ये वापरण्यात येणार आहे. एनव्हिडीयाचे म्हणणे आहे की, पीसी नव्या तऱ्हेने डिझाइन करण्यात आला असून नवा प्रोसेसर विशेषकरुन एआयसंबंधीत कामात अधिक तरबेज असलेला दिसणार असल्याचा दावा कंपनीचा आहे.

एआययुक्त कॉम्प्युटर

क्रिएटर्स, गेमर्स व एआय डेव्हलपर्स यांच्यासाठी चांगला अनुभव देण्यासाठी कंपनी निर्मित नवा कॉम्प्युटर सज्ज असेल. कंपनीने म्हटले की 30 पेक्षा जास्त लॅपटॉप आणि 10 डेस्कटॉप मॉडेल तयार करत असून त्यात नवी चिप घातली जाणार आहे. सध्याला हे तंत्रज्ञान प्रिमीयम लॅपटॉपसाठी असेल नंतर टप्प्याटप्प्याने स्वस्त आणि सामान्य उपयोगात येणाऱ्या कॉम्प्युटरमध्येही समाविष्ट केले जाईल.

Advertisement
Tags :

.