For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅपलला मागे टाकून ‘एनव्हिडीया’ने पटकाविला मान

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅपलला मागे टाकून ‘एनव्हिडीया’ने पटकाविला मान
Advertisement

एलॉन मस्कच्या कंपनीचा समभाग दमदार वधारला: चिप्सच्या वाढत्या मागणीचा फायदा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

शेअर बाजारातील चढउतारांमुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनीचा किताब अॅपलकडून हिसकावण्यात यश मिळवत आता एलॉन मस्कच्या  एनव्हिडियाने हा मान मिळवला आहे. बुधवारी एनव्हीडियाच्या समभागामध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे समभाग 5.2 टक्क्यांनी वाढून 1,224.40 वर बंद झाले होते. एआयला (कृत्रिम बुद्धिमता)बळ देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिप्सच्या वाढत्या मागणीमुळे एनव्हिडियाचा समभाग दमदार तेजी दाखवत आहे. एनव्हिडियाचा स्टॉक यावर्षी 147 टक्क्यांनी वाढला आहे. पहिला आयफोन रिलीज होण्यापूर्वी एनव्हिडियाचे बाजारमूल्य अॅपलपेक्षा जास्त होते. त्यावेळी, दोन्ही कंपन्यांचे बाजारमूल्य हे 10 बिलियनपेक्षा कमी होते. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शेअर बाजारातील वाढीमुळे हुआंगच्या संपत्तीत 5 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 107.4 अब्ज डॉलरची झाली.

Advertisement

ही सर्वात मूल्यवान कंपनी आहे

जगातील सर्वात मूल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्ट आहे. एनव्हिडिया आणि मायक्रोसॉफ्टच्या मालमत्तेत फक्त 3.15 ट्रिलियन डॉलरचा फरक आहे.

सर्वात मौल्यवान कंपन्या

मायक्रोसॉफ्ट पहिल्या स्थानावर असून ज्यांची मालमत्ता 3.151 ट्रिलियन डॉलर एनव्हीडिया दुसऱ्या स्थानावर आहे. ज्यांचे बाजारमूल्य 3.011 ट्रिलियन आहे. -अॅपल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे बाजार मूल्य 3.003 ट्रिलियन डॉलर आहे. -अल्फाबेट (गुगल) चौथ्या स्थानावर आहे. त्याची किंमत 2.179 ट्रिलियन डॉलर आहे.

Advertisement
Tags :

.