‘उफ्फ ये सियापा’मध्ये नुसरत भरुचा
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘उफ्फ ये सियापा’वरून चर्चेत आहे. कॉमेडी आणि ड्रामाने नटलेल्या या चित्रपटाची प्रदर्शनाच तारीख जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जी. अशोक यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘पिल्ला जमींदार’, ‘भागमती’ आणि ‘सुकुमारुडु’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर लव रंजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
नुसरतने अलिकडेच या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. नुसरतसोबत या चित्रपटात नोरा फतेही, सोहम शाह, ओsंकार कपूर आणि शारीब हाशमी हे कलाकार यात दिसून येतील. नोराने या चित्रपटाची एक पोस्ट शेअर करत याचे चित्रिकरण कोरोना महामारीनंतर केल्याची माहिती दिली तसेच हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा नव्हती, असे वक्तव्य केले आहे.
या चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे. नुसरतचा हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचदिवशी टायगरचा चित्रपट ‘बागी 4’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामुळे ‘उफ्फ ये सियापा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बागी 4 चित्रपटाशी स्पर्धा करावी लागणार आहे.