एनयुएसआयकडून कोळंब गावातील ४ शाळांना संगणक संच भेट
मालवण (प्रतिनिधी)
कोळंब गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद कांडरकर यांच्या सततच्या संपर्क माध्यमातून नॅशनल युनिएन ऑफ सी फेअर्स ऑफ इंडिया या संस्थेचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या संस्थेमार्फत कोळंब गावातील चार जिल्हा परिषदेच्या शाळांना अँडव्हान्स संगणक (कॉम्प्युटर) भेट दिले. त्यामध्ये कोळंब नं. १ शाळा, कोळंब कातवड, न्हिवे शाळा आणि कातवड खाईडा या शाळांचा समावेश आहे. सदर संगणक वाटप कार्यक्रम सर्जेकोट शाळेत पार पाडला. जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच अध्ययन अध्यापनात तंत्र ज्ञानाचा प्रभावी वापर केला जावा व्यासाठी आपली संस्था सतत प्रयत्नशील आहे आणि म्हणूनच असे शैक्षणिक व सामाजिक नवनवीन उपक्रम आपल्या संस्थने हाती घेतले आहेत, असे विचार NUSI या संस्थेचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी मनोगतात व्यक्त केले. यावेळी मिलिंद कांदळगावकर यांनी प्रमोद कांडरकर हे शैक्षणिक, सामाजिक कार्यात देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.