महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळनाडूत नर्सिंग विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

06:39 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोपींनी केले होते अपहरण

Advertisement

वृत्तसंस्था/ डिंडीगुल

Advertisement

कोलकात्यानंतर आता तामिळनाडूत आणखी एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या डिंडीगुल येथील  एका नर्सिंग विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. अज्ञातांनी तिचे अपहरण केले होते. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि मग तिला डिंडीगुल रेल्वेस्थानकानजीक सोडण्यात आले होते.

जखमी युवतीने रेल्वे स्थानकावर जात पोलिसांकडून मदत मागितली होती. पीडितेला डिंडीगुल  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असून तपास हाती घेण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप यांनी सांगितले आहे.

यापूर्वी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी संजय रॉय नावाच्या एका स्वयंसेवकाला अटक करण्यात आली आहे. सध्या तो सीबीआयच्या कोठडीत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article