नुपूर सेनॉन लवकरच होणार विवाहबद्ध
अभिनेत्री क्रीति सेनॉनची बहिण नुपूर लवकरच विवाह करणार आहे. नुपूर दीर्घकाळापासून गायक स्टेबिन बेनला डेट करत आहे. दोघेही जानेवारी महिन्यात विवाहबद्ध होणार आहेत. नुपूर 8 किंवा 9 जानेवारी रोजी विवाह करणार असल्याचे समजते. तिचा हा विवाहसोहळा उदयपूर येथील आलिशान फेयरमोंट पॅलेसमध्ये होणार आहे. हा विवाहसोहळा देखील अत्यंत भव्य असेल आणि यात अनेक दिग्गज कलाकार सामील होतील. उदयपूर येथे विवाहसोहळ्याची तयारी सुरू झाली आहे.
हा सोहळा दोन दिवस चालणार असून विवाह पारंपरिक राजस्थानी शैलीत पार पडणार आहे. 9 जानेवारी रोजी मेहंदी अन् संगीत असेल तर 9 जानेवारीला विवाहाचे विधी पार पाडले जाणार आहेत. नुपूरला एका म्युझिक व्हिडिओद्वारे प्रसिद्धी मिळाली होती. यात ती अक्षय कुमारसोबत दिसून आली होती. यातील गाण्याला बी प्राकने आवाज दिला होता. तर स्टेबिन बेन हा स्वत:च्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. यात मेरा महबूब, थोडा थोडा प्यार और बारिश काफी हे गाणे चर्चेत राहिले आहे. नुपूर आणि स्टेबिन दीर्घकाळापासून एकत्र आहेत. दोघेही सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करत असतात. त्यांच्या केमिस्ट्रीला चाहते पसंत करतात. नुपूरची बहिण क्रीति ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.