For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2019 पूर्वीच्या नंबरप्लेट बदलाव्या लागणार

11:33 AM Dec 28, 2024 IST | Radhika Patil
2019 पूर्वीच्या नंबरप्लेट बदलाव्या लागणार
Number plates from before 2019 will have to be changed
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

प्रादेशिक परिवहन विभागाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. 2019 पूर्वी ज्यांनी वाहन खरेदी केलेले आहेत. त्या सर्व वाहनांची जुनी नंबर प्लेट बदलून नवीन नियमानुसारची नंबर प्लेट लावावी लागणार आहे. यासंदर्भातील आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिले असून नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत.

Advertisement

यानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अंमलबजावणी करण्यासाठी रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालय, नवी दिल्ली यांनी 1 एप्रिल 2019 पासून उत्पादीत होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत तरतूद केली आहे. तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसवण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राप्त आहेत.

राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रीया राबवून 3 संस्था/उत्पादकांची निवड केली आहे. त्यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे 3 झोनमध्ये विभागणी केली असून प्रादेशिक परिवहन कार्यालय,
कोल्हापूरसाठीही संस्थेची नेमणूक केली आहे. या उत्पादक संस्थेने झोननिहाय अधिकृत फिटमेंट सेंटर्सची नियुक्ती केलेली आहे. वाहनधारकांनी
https//transport.mharastra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईटमेंट घेऊन वाहनांवर एचएसआरपी बसवण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. अधिकृत फिटमेंट सेंटर्सचीकडून वाहनांवर बसवण्यात आलेले एचएसआरपी हेच केवळ वैध मानले जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्ययावत केले जाईल, त्यामुळे इतर कोणत्याही एचएसआरपी निर्मात्याकडून अथवा पुरवठादाराकडून बसवलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व नियमांच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. एचएसआरपीनुसार नंबर प्लेट दुचाकीसाठी 450 रुपये, तीनचाकीसाठी 500 रुपये व इतर सर्व वाहनांसाठी 745 रुपये याप्रमाणे आहे.

                                  तर आरटीओमधील कामे होणार नाहीत

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता, बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट, इत्यादी वाहन संदर्भातील कामे वाहनांना नवीन नियमानुसार एचएसआरपी बसवल्याचे प्रमाणिकरण केल्यानंतरच करण्यात येतील.

                                                 कारवाई होणार

कोल्हापूर आरटीओच्या कार्यक्षेत्रात वापरात असलेली परंतू इतर परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या वाहनांना सुध्दा एचएसआरपी बसवणे बंधनकारक आहे. भविष्यात परिवहन आयुक्त कार्यालयाने याबाबतच्या अंमलबजावणीबाबतचे आदेश जारी केल्यानंतर एचएसआरपी न बसवलेली वाहने, बनावट एचएसआरपी बसवलेली वाहने यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

1 एप्रिल 2019 नंतर उत्पादीत झालेली वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रन नंबर प्लेट आहेत. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या वाहनांना नवीन नियमानुसार नंबर प्लेट एचएसआरपी बसवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे संबंधित सर्व वाहनधारकांनी याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.

                                                                         संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

Advertisement
Tags :

.