For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूरसंचार ग्राहकांची संख्या 119.7 कोटींवर

06:48 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
दूरसंचार ग्राहकांची संख्या 119 7 कोटींवर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील दूरसंचार ग्राहकांची संख्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये 0.38 टक्क्यांनी वाढून 119.7 कोटी झाली आहे. दूरसंचार नियामक ट्रायने सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. फेब्रुवारीमध्ये शहरी टेलिफोन ग्राहकांची संख्या 0.40 टक्क्यांनी वाढून 66.37 कोटी झाली आहे, तर ग्रामीण ग्राहकांची संख्या 0.34 टक्क्यांच्या अनुक्रमिक वाढीसह 53.13 कोटी झाली असल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने दिली आहे.

ट्रायच्या मासिक ग्राहक अहवालानुसार, ब्रॉडबँड ग्राहकांची एकूण संख्या जानेवारीच्या अखेरीस 91.10 कोटींवरून फेब्रुवारीच्या अखेरीस 91.67 कोटी झाली आहे. ब्रॉडबँड मार्केटमध्ये पहिल्या पाच सेवा पुरवठादारांचा वाटा 98.35 टक्के आहे. यामध्ये रिलायन्स जिओ (52.2 टक्के), भारती एअरटेल (29.41 टक्के), व्होडाफोन आयडिया (13.80 टक्के), बीएसएनएल (2.69 टक्के) आणि एट्रिया कन्व्हर्जन्स (0.24 टक्के) यांचा समावेश आहे.

Advertisement

अहवालात असे म्हटले आहे की फेब्रुवारीमध्ये लँडलाइन आणि मोबाइल दोन्ही सेवांमध्ये सर्व मंडळांमध्ये ग्राहकांची संख्या वाढली आहे. फेब्रुवारीअखेर लँडलाइन ग्राहकांची संख्या 1.73 टक्क्यांनी वाढून 3.31 कोटी झाली आहे.

Advertisement
Tags :

.