For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रॉडबँडधारकांची संख्या 100 कोटीवर

10:16 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्रॉडबँडधारकांची संख्या 100 कोटीवर
Advertisement

नवी दिल्ली : गेल्या नोव्हेंबर महिन्यात ब्रॉडबँडधारकांची संख्या 100 कोटीचा आकडा पार करु शकली आहे. ही माहिती ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया यांनी दिली आहे. ऑक्टोबरमध्ये ब्रॉडबँडधारकांची संख्या 95.9 कोटी इतकी होती. यात 95.5 कोटी वायरलेस नेटवर्क ग्राहक व 4.5 कोटी कायमस्वरुपी कनेक्शन्स आहेत. नोव्हेंबर महिन्यात ब्रॉडबँडधारकांची संख्या 100 कोटीचा आकडा पार करु शकली आहे.

Advertisement

कोण आहे आघाडीवर

यामध्ये जियो ही कंपनी आघाडीवर राहिली आहे. कंपनीने 51 कोटी इतके ग्राहक ब्रॉडबँडसेवेत जोडले आहेत. ज्यात 49.7 कोटी हे वायरलेस व 1.4 कोटी कायमस्वरुपी ब्रॉडबँडग्राहक आहेत. एअरटेलने 31.4 कोटी ब्रॉडबँड ग्राहक तर वोडाफोन आयडियाने 12.8 कोटी ग्राहक तर बीएसएनएलने 3 कोटी ग्राहक जोडले आहेत. गेल्या 10 वर्षात ब्रॉडबँडधारक ग्राहकांची संख्या सहापट वाढलेली दिसून आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.