For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोळशापासून गॅस निर्मितीचे ‘एनटीपीसी’चे ध्येय

06:53 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोळशापासून गॅस निर्मितीचे ‘एनटीपीसी’चे ध्येय
Advertisement

3 ते 4 वर्षांत मोठ्या प्रमाणात सिंथेटिक गॅस उत्पादनाचे ध्येय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारी मालकीची वीज निर्मिती कंपनी एनटीपीसी लिमिटेड कोळसा गॅसिफिकेशन व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. येणाऱ्या 3 ते 4 वर्षांत कंपनी दरवर्षी किमान 5 ते 10 दशलक्ष टन सिंथेटिक गॅस उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवते, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Advertisement

गॅस उत्पादनाचा खर्च प्रति दशलक्ष मेट्रिक ब्रिटिश थर्मल युनिट (एमएमबीटीयू) सुमारे 10 ते 12 डॉलर असण्याची शक्यता आहे. संबंधीत अधिकाऱ्याने सांगितले की, एनटीपीसीने निश्चित केलेली गॅसची किंमत द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) च्या सध्याच्या किमतीच्या जवळपास असेल आणि खरेदीदार शोधण्यात कंपनीला कोणतेही आव्हान अपेक्षित नाही. उत्पादित गॅस एकतर देशांतर्गत बाजारात विकला जाईल किंवा कंपनीच्या स्वत:च्या प्लांटमध्ये वापरला जाईल. एनटीपीसी सिंथेटिक गॅस तयार करण्यासाठी स्वत:चा कोळसा वापरणार असल्याची माहिती आहे.

एनटीपीसी त्यांच्या कोळसा गॅसिफिकेशन उपक्रमासाठी तंत्रज्ञान सल्लागार नियुक्त करण्याचा विचार करत आहे. कंपनी चालू आर्थिक वर्षात 2025-26 मध्ये यासाठी निविदा जारी करण्याची योजना आखत आहे. कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळसा गॅसिफिकेशन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 8,500 कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहनांना मान्यता दिली आहे. कोळसा गॅसिफिकेशन उपक्रम 2030 पर्यंत देशाच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा सध्याच्या 6 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याच्या सरकारच्या योजनेशी सुसंगत आहे.

अणुऊर्जा प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले की, एनटीपीसी 2047 पर्यंत किमान 30 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवते. कंपनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हरियाणासह देशभरातील 16 राज्यांमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी जमीन शोधत आहे. कंपनी प्रकल्पांसाठी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (पीएचडब्ल्यूआर) तंत्रज्ञानाचा वापर करू शकते. एनटीपीसीने अलीकडेच अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. सप्टेंबरमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे 2,800 मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली.

Advertisement
Tags :

.