For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीट पेपर लीक वादानंतर एनटीएची अॅक्शन

06:46 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
नीट पेपर लीक वादानंतर एनटीएची अॅक्शन
Advertisement

पूर्णवेळ सुरक्षेसाठी 7.5 कोटीची निविदा जारी

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नीट-यूजी पेपर लीक वादानंतर एनटीएने परीक्षा सुरक्षेला आणखी मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. याच्या अंतर्गत एनटीएने स्वत:चे मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये आणि अन्य संवेदनशील ठिकाणी 24 तास सुरक्षा व्यवस्थेसाठी एक खासगी एजेन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता सुमारे 7.5 कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे. याचबरोबर एनटीएने कार्यालयांची साफ-सफाई आणि प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित छपाईसाठी देखील नव्या एजेन्सींकडून अर्ज मागविले आहेत.

Advertisement

निवडण्यात आलेली सुरक्षा एजेन्स दिल्लीतील एनटीए मुख्यालय, ओखला येथील क्षेत्रीय कार्यालय आणि अन्य महत्त्वपूर्ण ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहे. या एजेन्सीची जबाबदारी कर्मचारी, येणारे लोक, गोपनीय परीक्षा सामग्री, सर्व्हर रुम, स्टोर रुम आणि आवश्यक दस्तऐवजांची सुरक्षा करणे असेल. हा सुरक्षा करार प्रारंभी दोन वर्षांसाठी केला जाणार आहे, जो कामगिरीच्या आधारावर वाढविला जाऊ शकतो. इच्छुक एजेन्सींना 17 ऑगटस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

एनटीएने स्वत:च्या खरेदी प्रक्रियेला आणखी मजबूत करण्यासाठी हाउसकीपिंग, सुरक्षा व्यवस्था आणि प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित छपाईसाठी वेगवेगळ्या निविदा जारी केल्या आहेत. या निविदा सरकारी ई-मार्केटप्लेसद्वारे जारी करण्यात आल्या आहेत. एनटीएनुसार दिल्ली कार्यालयाची सुरक्षा आणि हाउसकीपिंग सेवांसाठी निविदा जमा करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट आहे. तर प्रिटिंग सेवांसाठी अंतिम तारीख 20 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. या पावलांचा उद्देश परीक्षा प्रक्रियेला अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित करणे आहे.

गुणवत्तेला प्राथमिकता

वाढत्या वादादरम्यान आयोगाचे हे पाऊल आगामी काळात कुठल्याही प्रकारे समस्या येऊ नये याकरता उचलण्यात आले आहे. एनटीएने सुरक्षा सेवांसाठी केवळ सर्वात कमी किंमतीच्या निविदेला निवडण्याऐवजी गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड (क्यूसीबीएस) प्रणालीला अवलंबिले आहे. या व्यवस्थेच्या अंतर्गत तांत्रिक प्रस्तावाला 70 टक्के आणि किंमतयुक्त निविदेला 30 टक्के गुण दिले जातील. ज्या एजेन्सी तांत्रिक चौकशीत कमीतकमी 70 अंक प्राप्त करणार नाहीत, त्यांना पुढील प्रक्रियेत सामील केले जाणार नाही.

Advertisement
Tags :

.