‘एनटीए’ महासंचालक सुबोध कुमारना हटवले
06:22 AM Jun 23, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
आयएएस प्रदीप सिंह खरोला नवे ‘डीजी’ : पेपर लीकच्या वादात मोठे फेरबदल
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आयएएस प्रदीप सिंह खरोला एनटीएचे महासंचालक (डीजी) असतील. नुकत्याच झालेल्या नीट आणि युजीसी-नेट परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणावरून ‘एनटीए’ सर्वांच्याच निशाण्यावर असताना केंद्र सरकारने आता मोठी कारवाई केली आहे. पदावरून हटवण्याबरोबरच पुढील नियुक्तीसाठी त्यांना प्रतीक्षा करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षांमधील अनियमितता लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
Advertisement
Next Article