महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘डीयु’ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद ‘एनएसयूआय’कडे

06:35 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपाध्यक्ष आणि सचिव पदावर अभाविपची बाजी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (डीयुएसयु) निवडणुकीचा अंतिम निकाल सोमवारी लागला आहे. या निवडणुकीत एनएसयूआयने अध्यक्ष आणि सहसचिव पदावर तर अभाविपने उपाध्यक्ष आणि सचिव पदावर बाजी मारली आहे. अध्यक्षपदी एनएसयूआयचे रौनक खत्री विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी अभाविपचे भानू प्रताप विजयी झाले आहेत. याशिवाय दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मृतवृंदा यांनी सचिवपदी, तर एनएसयूआयच्या लोकेश यांनी संयुक्त सचिवपदी बाजी मारली आहे. विद्यार्थी संघटनेच्या चार जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी आठ, उपाध्यक्षपदासाठी पाच आणि सचिव व सहसचिवपदासाठी प्रत्येकी चार उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयोत्सवावर बंदी असल्यामुळे मोठा जल्लोष झालेला नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article