For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनएसईच्या आयपीओला संचालक मंडळाचाही हिरवा कंदील

06:40 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
एनएसईच्या आयपीओला संचालक मंडळाचाही हिरवा कंदील
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांना आयपीओ सादरीकरण करण्यासाठी संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. बाजारातील नियामक सेबी यांनी यापूर्वी एनएसई यांच्या आयपीओस मंजुरी दिली होती. आता काही दिवसांपूर्वी एनएसई संचालक मंडळाच्या बैठकीत आयपीओला हिरवा कंदील दाखवण्यात आला. ब्लुमबर्गच्या अहवालानुसार आयपीओचे मूल्य हे 22,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

सध्याचे समभागधारक या आयपीओ अंतर्गत चार ते साडेचार टक्के इतकी हिस्सेदारी विक्री करू शकतात असेही सांगितले जात आहे. टीमसेक होल्डिंग्ज, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एसबीआय कॅपिटल मार्केट यांच्याकडून हिस्सेदारी विक्री केली जाणार असल्याचे समजते. एलआयसीची एनएसईमध्ये 10.7 टक्के हिस्सेदारी आहे. तर एसबीआयची 3.23 टक्के हिस्सेदारी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.