For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनएसई जूनअखेर आयपीओसाठी सेबीकडे करणार अर्ज

06:45 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
एनएसई जूनअखेर आयपीओसाठी सेबीकडे करणार अर्ज
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आपला मेगा आयपीओ सादर करणार असून या संदर्भातला डीआरएचपी अर्ज बाजारातील नियामक सेबीकडे जूनअखेरपर्यंत सादर करू शकते. या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचे समभाग बाजारामध्ये सूचीबद्ध करण्याची योजना कंपनीची आहे.

याचाच अर्थ कंपनी यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध होऊ शकते. गुंतवणूकदार या आयपीओची प्रकर्षाने वाट पाहत आहेत. आयपीओ सादरीकरणासाठी बराच कालावधी लागलेला आहे. या आधीच्या वृत्तानुसार बाजारातील नियामक सेबीकडे मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्ज दाखल करण्याची माहिती होती. पण त्यात आता बदल करण्यात आला आहे. नव्याने मिळालेल्या माहितीनुसार जून अखेर आयपीओसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो.

Advertisement

एनएसई या आयपीओच्या माध्यमातून 23 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. परंतु येत्या काळात उभारणीच्या रकमेमध्ये वाढही होऊ शकते.

Advertisement
Tags :

.