एनएसईचा आयपीओ लवकरच: हालचाली गतीमान
वृत्तसंस्था मुंबई
गेल्या एक दशकापासून लांबणीवर पडलेला देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज एनएसईचा आयपीओ लवकरच बाजारात सुचीबद्ध होण्याच्या हालचाली अधिक गतीमान झाल्या आहेत. बाजारातील नियामक सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात कागदपत्रे दाखल करु शकते. सर्वकाही योजनाबद्धरित्या झाले तर भारतीय भांडवली बाजारातला हा सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो.
5 लाख कोटीचा आयपीओ
5 लाख कोटीपेक्षा अधिक मूल्याचा हा आयपीओ ठरणार असून 1.8 लाख शेअरधारकांच्या समावेश असणाऱ्या एनएसईच्या सुचीबद्ध होण्याकडे तमाम गुंतवणूवदार, संस्थात्मक गुंतवणूकदार व संपूर्ण बाजाराचे लक्ष लागून राहिले आहे. देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज एनएसई सेबीकडे अर्ज दाखल करु शकते. 6 फेब्रुवारी रोजी एनएसईच्या संचालक मंडळाने प्रस्तावित आयपीओला मंजुरी दिली होती.
कोणाची आहे हिस्सेदारी
या एनएसईमध्ये भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसी यांची 10.72 इतकी हिस्सेदारी आहे. तर एसबीआय व सहकारी कंपनी एसबीआय कॅपिटल मार्केटस् यांची 7.5 टक्के हिस्सेदारी आहे.