For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनएसई आयपीओ तयारीला वेग, ब्रोकर्सनी घटवली हिस्सेदारी

06:19 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
एनएसई आयपीओ तयारीला वेग  ब्रोकर्सनी घटवली हिस्सेदारी
Advertisement

53.9 टक्केवरुन 2026 मध्ये 35.6 टक्क्यांवर

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई यांच्या आयपीओच्या तयारीला वेग आला असून ब्रोकर्स आणि सहकाऱ्यांनी एनएसईमधील आपली हिस्सेदारी अलीकडेच घटवली आहे. 2019 मध्ये 53.9 टक्के इतकी असणारी हिस्सेदारी मार्च 2026 मध्ये 35.6 टक्क्यांवरती घसरली आहे.

Advertisement

ब्रोकरेज कंपन्या देशातील सर्वात मोठी शेअर बाजारातील नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई सूचीबद्ध होण्यापूर्वी त्यातील हिस्सेदारी कमी करत आहेत. एनएसईमधील व्यवहार सदस्य आणि सहकाऱ्यांनी 2019 मध्ये 53.9 टक्के असणारी हिस्सेदारी अलीकडे मार्च 2026 मध्ये 35.6 टक्क्यांवर घटवली आहे. एनएसई आपला आयपीओ सादर करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न करत आहे.

केला बदल

यापूर्वी स्टॉक एक्सचेंजची मालकी आणि त्याचे संचालन स्टॉक ब्रोकरांच्या हाती होते. 2000 पासून यामध्ये बदल करण्यात आला. तसे केले नसते तर ब्रोकर्स आपल्या फायद्यासाठी शेअर बाजाराचे कामकाज प्रभावीत करु शकले असते. ब्रोकर्सना स्टॉक एक्सचेंजमध्ये मालकी हिस्सेदारी दिली गेली पण यासह त्यांच्या संचालनातील भूमिका हळूहळू कमी करण्यावर भर दिला गेला.

Advertisement
Tags :

.