एनएसईचा गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा
वृत्तसंस्था/ मुंबई
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या असे निदर्शनास आले आहे की, ‘विवेक’ नावाची आणि 9039116755 हा मोबाइल क्रमांक वापरणारी व्यक्ती ट्रेडिंगसाठी खाते हाताळण्यासाठी गुंतवणूकदारांना त्यांचे लॉग इन आयडी/पासवर्ड मागत आहे. गुंतवणूकदारांना अशा प्रकारची कोणतीही योजना, उत्पादन देऊ करणाऱ्या, शेअर बाजारातून खात्रीशीर, सूचक परताव्यांची हमी देणारी व्यक्ती किंवा संस्थेसोबत व्यवहार न करण्याचा सल्ला एक्सचेंजने दिला आहे, याबाबत जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की, अशा प्रकारची खात्री देण्यास कायद्याने मनाई आहे.
सदर व्यक्ती/संस्था राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याची अथोराइज्ड पर्सन किंवा सदस्य म्हणून नोंदणीकृत नाही, याचीही नोंद घ्यावी. एक्सचेंजने आपल्या संकेतस्थळावर https//www.nseindia.com/invest/find-a-stock-broker या लिंकअंतर्गत ‘नो/लोकेट युअर स्टॉक ब्रोकर’ ही सुविधा दिली आहे. या लिंकवर नोंदणीकृत अधिकृत व्यक्तींची माहिती शोधता येऊ शकते. त्याशिवाय या लिंकवर ट्रेडिंग सदस्यांनी एक्सचेंजकडे जाहीर केलेल्या गुंतवणूकदारांकडून, गुंतवणूकदारांना पैसे देण्यासाठी, मिळविण्यासाठी जाहीर केलेली ग्राहक बँक खातीही देण्यात आली आहेत. गुंतवणूकदारांनी कोणत्याही व्यक्तीसह व्यवहार करताना तपशील तपासणे