एनएसडीएलची आयपीओ आणण्याची तयारी
06:52 AM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कोलकाता :
Advertisement
एनएसडीएल ही कंपनीसुद्धा आयपीओ सादरीकरणासाठी लगबग करताना दिसत आहे. याचवर्षी कंपनीचा आयपीओ बाजारात लाँच केला जाणार आहे. गेल्या तीन आठवड्यात शेअरबाजारात काहीसा नरमाईचा सूर पाहून एनएसडीएल सावध झाली आहे.
मुंबईत स्थित असणाऱ्या नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने सप्टेंबर 2024 मध्ये आयपीओ आणण्याकरीता मंजुरी मिळवलेली आहे. हा आयपीओ कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत बाजारात दाखल करण्याची संधी असणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सदरच्या कंपनीला वर्षभरात आपला आयपीओ बाजारात लाँच करण्याची अट असते. कंपनी आयपीओतून 576 लाख इक्विटी समभाग विकू शकते. यामध्ये एनएसई, आयडीबीआय बँक आणि एचडीएफसी बँक हे समभागधारक आपले समभाग विक्री करु शकतात, असेही म्हटले जात आहे.
Advertisement
एनएसईची 24 टक्के हिस्सेदारी
एनएसईची एनएसडीएलमध्ये 24 टक्के इतकी हिस्सेदारी असल्याची माहिती आहे.
Advertisement