कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आता ‘सिम’शिवाय व्हॉट्सअॅप, टेलिग्राम बंद

06:35 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सायबर फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना : दूरसंचार विभागाकडून सोशल मीडिया अॅप्ससाठी नवे नियम 

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील सायबर सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी सरकारने व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट इत्यादींसह सर्व लोकप्रिय मेसेजिंग आणि सोशल अॅप्ससाठी नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांनुसार, कोणताही वापरकर्ता सक्रिय सिम कार्डशिवाय किंवा केवळ वायफाय वापरून ही अॅप्स वापरू शकणार नाही. या नियमांमुळे अॅप्स वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सक्रिय मोबाईल नंबरद्वारेच प्रमाणीकरण करणे बंधनकारक असेल. परिणामी, सायबर गुन्हेगार किंवा दहशतवादी घटकांना अज्ञात राहून या अॅप्सचा गैरवापर करणे कठीण होईल. सरकारच्या या निर्णयामुळे वापरकर्त्यांची सुरक्षा अधिक वाढणार आहे.

दूरसंचार विभागाच्या सायबरसुरक्षा सुधारणा नियम, 2025 अंतर्गत केंद्र सरकारने नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने शनिवारी मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत एक नवीन आदेश जारी केला. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट, अराटाई आणि जोश सारखे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता मोबाईलमध्ये सक्रिय सिम कार्डशिवाय काम करू शकणार नाहीत. या कडक नियमांमुळे विनासिमकार्ड सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्स वापरणाऱ्या लाखो भारतीय वापरकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे.

सायबर फसवणूक नियंत्रणात येणार

नव्या नियमांमुळे सायबर फसवणूक करणाऱ्यांना शोधण्यास मदत होईल असा सरकारचा दावा आहे. सिम कार्ड अॅपशी जोडलेले ठेवल्याने वापरकर्ता, नंबर आणि डिव्हाइसमधील आवश्यक ट्रेसेबिलिटी राखल्यामुळे स्पॅम आणि फसव्या संप्रेषणांना प्रतिबंध करण्यात मदत होईल, असे सरकारचे मत आहे. आता व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसारखे प्लॅटफॉर्म वापरकर्त्याच्या अनुभव आणि गोपनीयतेशी तडजोड न करता हे नवीन नियम कसे अंमलात आणतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवा नियम 90 दिवसांत लागू होणार

भारत सरकारच्या नवीन नियमानुसार, या अॅप्सना 90 दिवसांच्या आत वापरकर्त्याचे सिम कार्ड त्यांच्या सेवेशी सतत जोडलेले राहते याची खात्री करावी लागेल. साहजिकच कोणतेही अॅप वापरण्यासाठी सिम कार्ड तुमच्या डिव्हाइसमध्ये सतत सक्रिय राहिले पाहिजे, असे असे दूरसंचार विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्राम वेब सारख्या ब्राउझरद्वारे त्यांच्या खात्यात लॉग इन करणाऱ्यांनाही मोठ्या अडचणी येऊ शकतात. अॅप सुरू ठेवण्यासाठी दर सहा तासांनी वापरकर्त्यांना लॉग आउट करून पुन्हा लॉगिन करण्यासाठी क्यूआर कोडद्वारे पुन्हा प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

दूरसंचार विभागाचा आदेश काय सांगतो?

► मेसेजिंग प्लॅटफॉर्मने वापरकर्त्याचे नोंदणीकृत सिम त्या मोबाईलमध्ये सक्रिय असेल तेव्हाच अॅप चालेल याची दक्षता घ्यावी.

► ‘सिम बाइंडिंग’ अंतर्गत सिम मोबाईलमधून काढून टाकल्यास व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेजिंग अॅप्स बंद करण्याची उपायोजना करावी.

► वेब ब्राउझरद्वारे म्हणजेच लॅपटॉप किंवा डेस्कटॉपद्वारे लॉग इन करणाऱ्या वापरकर्त्यांसाठीही मोठा बदल करण्यात आला आहे.

► मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना दर सहा तासांनी लॉगआउट करावे लागेल. त्यानंतर, लॉगिन फक्त क्यूआर कोडद्वारे शक्य होईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article