For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता कर्जाची देवाण-घेवाण युपीआयद्वारे

06:17 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता कर्जाची देवाण घेवाण युपीआयद्वारे
Advertisement

अॅपमुळे काही मिनिटात कार व गृहकर्ज मिळणार : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा  

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येणाऱ्या काळात आता कार, वैयक्तिक किंवा गृहकर्जासाठी ग्राहकांना बँकांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. कारण भारतीय रिझर्व्ह बँक ही प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सरकार आता पेमेंट अॅपसारखे युनिफाइड लेंडिंग (युपीआय) प्लॅटफॉर्म सादर करणार आहे.

Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या नव्या योजनेची घोषणा केली. मागील वर्षी (ऑगस्ट 2023) रोजी आरबीआयने घर्षणरहित क्रेडिटसाठी तांत्रिक व्यासपीठाच्या आधारे पायलट प्रकल्प सुरु केला होता, असेही दास यांनी सांगितले आहे. कर्जाच्या नवीन अॅपच्या सादरीकरणानंतर एका वर्षात या प्लॅटफॉर्मच्या आधारे शेतकरी क्रेडिट कार्ड अर्ज, डेअरी कर्ज, एमएसएमई कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज यावर काम केले जाणार असल्याची माहिती आहे.

काय फायदा होईल?

? सध्याच्या अॅपवर सरकार व आरबीआयचे मर्यादित नियंत्रण आहे

? परंतु युपीआय प्लॅटफॉर्म अॅप्सवर सरकारचे थेट निरीक्षण असेल.

? आताप्रमाणे तुम्ही पिन टाकून युपीआयसह त्वरित पैसे देऊ शकता. त्याच प्रकारे तुम्ही पिन टाकून कर्ज घेऊ शकाल. ते तुमच्या बँक खात्याशी देखील जोडले जाईल.

? युएलआय क्रेडिट प्रक्रिया सुलभ करू इच्छित आहे

युनिफाइड लेंडिंग इंटरफेस (युएलआय) हे कर्ज मिळवण्याची संपूर्ण प्रणाली सुलभ करण्यासाठी, क्रेडिट प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि कागदी काम कमी करण्यासाठी डिझाइन केले आहे.

? हे ओपन अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) सह ओपन आर्किटेक्चरचे मिश्रण करते, ज्यामुळे वित्तीय संस्थांना ‘प्लग अँड प्ले’ मॉडेलमध्ये सहजपणे कनेक्ट होऊ शकते.

हे कसे चालेल?

युएलआय अॅप आधार, ई-केवायसी, राज्य सरकारी जमीन रेकॉर्ड, पॅन प्रमाणीकरण आणि खाते एकत्रित करणाऱ्यांसह विविध स्त्राsतांकडून डेटा संकलित करेल. ते दुग्ध सहकारी संस्थांकडून दुधाचा डेटा आणि घरगुती किंवा मालमत्ता शोध डेटा यासारख्या सेवांशी देखील जोडले जाईल.

युपीआय 2016 मध्ये लाँच

शक्तीकांत दास म्हणाले की, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने एप्रिल 2016 मध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) लाँच केले होते. युपीआयने आपल्या 8 वर्षांच्या प्रवासात लक्षणीय यश मिळवले आहे.

Advertisement
Tags :

.