For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता क्षयरुग्ण होणार 6 महिन्यात ठणठणीत

06:57 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता क्षयरुग्ण होणार 6 महिन्यात ठणठणीत
Advertisement

पूर्वी लागायचे 20 महिने : 4 नवीन औषधे वापरण्यास मंजुरी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील क्षयरुग्णांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत चार नवीन औषधे वापरण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता टीबी रुग्णांसाठी मोक्सीफ्लॉक्सासीन, प्रीटोमॅनिड, बेडाक्विलिन आणि लाइनझोलिड या औषधांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या औषधांमुळे रुग्णांचा बरा होण्याचा दर सुधारेल असे बोलले जात आहे.  केंद्र सरकारचे 2025 पर्यंत टीबीचे देशातून उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे देशातील या मोहिमेला बळ मिळणार आहे.

Advertisement

आत्तापर्यंत भारतात टीबी ऊग्णांचा पूर्ण कोर्स सुमारे 20 महिन्यांचा होता. तर आता नवीन पद्धतीमुळे या उपचारांचा कालावधी केवळ 6 महिन्यांचा राहणार आहे. अर्थातच क्षयरुग्ण केवळ सहा महिन्यात ठणठणीत होणार आहे. टीबीच्या रुग्णांवर लवकर उपचार करण्यासाठी चार नवीन क्षयरोगविरोधी औषधे मदत करतील. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, उपचारामध्ये समाविष्ट केलेल्या सर्व नवीन दाव्यांना सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून (सीडीएससीओ) परवानगी मिळाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी आणि चांगल्या उपचारांसाठी नवीन प्रभावी उपचार पद्धत सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून देशात टीबीच्या रुग्णांमध्ये कमालीची घट होणार असून 2025 पर्यंत हा आजार पूर्णपणे नष्ट करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशात सध्या 75,000 औषध-प्रतिरोधक टीबी ऊग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत बहु-औषध प्रतिरोधक क्षयरोग (एमडीआर-टीबी) विऊद्ध ‘बीपीएएलएम’ या नवीन आणि प्रभावी उपचार पद्धतीला मंजुरी दिली आहे.

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, 2022 मध्ये जगभरात एक कोटीहून अधिक टीबीची प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 27 टक्के भारतीय होते. 2022 मध्ये 28 लाख भारतीय टीबीने बाधित होतील. 2022 मध्ये टीबीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जगभरात सुमारे 13 लाख होती. ही आकडेवारी पाहता डब्ल्यूएचओ टीबी हा कोविड-19 नंतरचा सर्वात संसर्गजन्य आजार असल्याची टिप्पणीही केली होती. भारतात 2021 मध्ये क्षयरोगामुळे सुमारे 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2022 मध्ये टीबीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3.31 लाखांवर आली. पण आजही भारतासाठी ही एक मोठी आरोग्य समस्या असून तिच्या निराकरणासाठी आणखी प्रयत्न आणि चांगल्या उपचारांची गरज आहे.

Advertisement
Tags :

.