महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आता ‘जेएनयू’वर येणार चित्रपट

06:02 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रवि किशन अन् उर्वशी रौतेला साकारणार भूमिका

Advertisement

सनी देओलचा चित्रपट ‘सिंह साहब दी ग्रेट’द्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाला अत्यंत लोकप्रिय मानले जाते. वर्तमान काळात उर्वशी ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. स्वत:च्या सौंदर्यासोबत अभिनयासाठी देखील ती ओळखली जाते.

Advertisement

उर्वशी आता एका नव्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘जेएनयू’ आहे. या जेएनयूचा येथील अर्थ ‘जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी’ असा आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टरसोबत प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. जेएनयू चित्रपटात उर्वशीसोबत रवि किशन सारखे अनेक कलाकार दिसून येणार आहेत.

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका हातात भारताचा नकाशा पकडलेल्या स्थितीत दिसून येत आहे, तसेच त्यावर ‘एक विद्यापीठ देशाला तोडू शकते का’ असे लिहिले गेले आहे.  चित्रपटाच्या या पोस्टरला पाहून यात विद्यापीठातील राजकारण दाखविले जाणार हे स्पष्ट होते. चित्रपटात उर्वशी रौतेला आणि रवि किशन यासारखे कलाकार विद्यापीठ राजकारणाचा हिस्सा म्हणून दिसून येणार आहेत.

उर्वशी आणि रवि किशनसोबत चित्रपटात पियूष मिश्रा, सिद्धार्थ बोधके, सोनाली सहगल, रश्मि देसाई आणि विजय राज यासारखे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाला 5 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केले जाणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article