महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आता थेट फास्टॅगवरुन कापले जाणार चलन

06:07 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1 जुलैपासून कर्नाटक सरकार इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम लागू करणार 

Advertisement

 अपघात व वाहतून नियमांच्या उल्लंघावर नियंत्रण होणार असल्याचा दावा

Advertisement

नवी दिल्ली :

महामार्गावर वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन लक्षात घेता कर्नाटक सरकार इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम लागू करणार आहे. ही प्रणाली 1 जुलैपासून संपूर्ण बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे नेटवर्कवर लागू  करण्यात येणार आहे. या प्रणालीअंतर्गत, बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग कॅम्रेयांनी जोडला जाईल, जेणेकरून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना सहज ओळखता येईल आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होणार असल्याचेही म्हटले आहे.

ट्रॅफिक आणि रोड सेफ्टीचे एडीजीपी आलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम लागू करण्याची घोषणा केली. ज्यामध्ये बेंगळुरू-म्हैसूर रोडवरील आयटीएमएस एकत्रीकरण तसेच म्हैसूर शहर आणि जिह्यातील क्षेत्रांचा समावेश आहे.

8.5 कोटींहून अधिक गुंतवणूक

डिसेंबर 2022 मध्ये बेंगळुरूमध्ये लाँच झालेल्या आयटीएमएसमध्ये शहरातील 50 जंक्शनवर 250 ऑटो नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेरे आणि 80 रेड लाइट व्हायोलेशन रेकग्निशन कॅमेरे आहेत. अहवालानुसार, म्हैसूरच्या विस्तारासाठी सुमारे 8.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, ज्यामध्ये म्हैसूर शहरासाठी 4 कोटी रुपये आणि जिह्यासाठी 4.5 कोटी रुपये आहेत.

कव्हर होणारी आवश्यक क्षेत्रं

नवीन स्थापित एएनपीआर कॅमेऱ्यांद्वारे सुलभ वाहतूक नियमांची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. म्हैसूर जिह्यातील हुन्सूर, एचडी कोटे, नंजनगुड आणि टी नरसीपुरा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांना कव्हर करेल. या उपक्रमांतर्गत आगामी भविष्यातील योजनांमध्ये बेंगळुरूला जवळच्या तहसील आणि जिह्यांना जोडणाऱ्या महामार्गांवर आयटीएमएस कॅमेरे बसवणे समाविष्ट आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article