For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता प्रिंटींग प्रेसचालकांवर दडपशाही

11:36 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता प्रिंटींग प्रेसचालकांवर दडपशाही
Advertisement

बॅनर्सवर कन्नडचा वापर करा; अन्यथा कारवाई करण्याचा इशारा

Advertisement

बेळगाव : काही दुराभिमानी संघटनांकडून इंग्रजी व मराठी फलकांना लक्ष्य केले जात असतानाच आता प्रशासनानेही त्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी थेट बेळगावमधील प्रिंटींग प्रेस ओनर्स सदस्यांची बैठक बोलाविली. सरकारच्या नियमावलीप्रमाणेच यापुढे फलकांचे प्रिंटींग करावे लागेल, अन्यथा संबंधित प्रेस ओनर्सवर कारवाई करण्याचा इशाराच दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. बेंगळूर पाठोपाठ बेळगावमध्येही काही दुराभिमानी संघटनांनी हॉटेल, आस्थापने, सहकारी पतसंस्था यांच्या नामफलकातील इंग्रजी व मराठीला विरोध दर्शविला आहे. सरकारच्या नियमावलीनुसार नामफलकावर 60 टक्के कन्नड भाषेचा उपयोग करून  40 टक्के इतर भाषांचा वापर करण्याची सूचना केली आहे. परंतु, बेळगावमध्ये बहुभाषिक मराठी असून व्यापारासाठी येणारे ग्राहक हे गोवा व महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे मराठी व इंग्रजी फलक लावणे व्यापारासाठी गरजेचे आहे. बेळगावमधील व्यापारी दुराभिमानी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने आता पोलीस प्रशासनाने आपल्या पद्धतीने दडपशाही सुरू केली आहे. मंगळवारी रात्री बेळगाव परिसरातील डिजिटल बॅनर्स प्रिंटर, त्याचबरोबर इतर प्रिंटींग प्रेसच्या मालकांची बैठक पोलीस प्रशासनाने घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, तसेच खडेबाजार व मार्केट पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

प्रिंटींग प्रेस चालकांवर दादागिरी...

Advertisement

कोणत्याही फलकाचे प्रिंटींग करताना त्यावर राज्य सरकारच्या नियमानुसार कन्नड भाषेचा वापर करावा. तसे न झाल्यास संबंधित प्रिंटींग प्रेस चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची तंबी देण्यात आली आहे. ही एक प्रकारची दादागिरी असून अशा प्रकारांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. अशा प्रकारांमुळे बेळगावमध्ये भाषिक तेढ निर्माण होत असून हे प्रकार वाढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.