आता सिमकार्डची पडताळणी एआयद्वारे होणार
दूरसंचार विभागाकडून नवीन एएसटीआर प्रणाली सुरु
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता कृत्रिम बुद्धीमता (एआय) च्या मदतीने बनावट सिम कार्ड ओळखले जाणार आहे. दूरसंचार विभागाने (डीओटी) यासाठी नवीन एएसटीआर प्रणाली सुरू केली आहे. तंत्रज्ञानाचा वेगाने जसा विस्तार होत आहे, त्याच वेगाने सायबर गुन्हे देखील वाढत आहेत. बनावट सिम कार्ड वापरून लोकांची ऑनलाइन फसवणूक होत आहे. आतापर्यंत सरकारने ही फसवणूक कमी करण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली आहेत.
यामध्ये आता दूरसंचार विभागाने सायबर गुन्हे कमी करण्यासाठी अनेक मोठी पावले उचलली आहेत. डीओटीने बनावट सिमकार्ड ब्लॉक करण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे एआयद्वारे बनावट सिमकार्ड ओळखले जाणार असून ते बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास ब्लॉक देखील करण्याची सोय होणार आहे.
एआय शिल्ड एएसटी म्हणजे काय?
दूरसंचार विभागाच्या मते, अॅस्टर एनएस एआयद्वारे चेहरा ओळखण्यावर आधारित उपायाने सुसज्ज एक साधन असणार आहे. यामध्ये, वापरकर्त्याच्या चेहऱ्यावरील पडताळणीद्वारे दूरसंचार ग्राहकाची पडताळणी केली जाणार आहे. जेणेकरून बनावट सिमकार्ड ओळखले जाणार आहेत आणि सायबर फसवणूक रोखली जाणार असल्याचे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. जर एखाद्याने बनावट कागदपत्राद्वारे सिम कार्ड जारी केले असेल, तर एआय आधारित चेहरा ओळखण्याचे वैशिष्ट्या दस्तऐवजाची पडताळणी करेल. जर कागदपत्राची पडताळणी केली नसेल, तर सिम कार्ड ब्लॉक केले जाणार आहे.
ठळक बाबी...
? बनावट सिमकार्ड ओळखण्यास आणि ब्लॉक करण्यासाठी एआय शील्ड की चा होणार वापर
? बनावट कागदपत्रांवर सिम कार्ड असल्यास त्याचा वापर आता थांबवणार
? डीओटीने एएसटीआर विकसित केले असून, जे बनावट सिम कार्ड ओळखणार
? सिम फसवणुकीविरुद्ध हे भारताचे एआय कवच राहील
? ही सेवा भारताच्या दूरसंचार परिसंस्थेला सुरक्षित, स्मार्ट आणि फसवणूक-प्रतिरोधक बनवेल.