महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राहुल गांधींचा आता ‘यू टर्न“

06:51 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खासगी संपत्ती सर्वेक्षण, पुनर्वाटप आदी आश्वासनांवरुन आता राहुल गांधी यांनी आपली भूमिका बदलत ‘यू टर्न“ घेतला आहे. देशावर किती प्रमाणात अन्याय झाला, हे समजून घेणे एवढाच या आश्वासनाचा हेतू आहे. हे आश्वासन प्रत्यक्षात आणले जाईल, असे मी कधी म्हटलेले नाही. देशातील मोठ्या संख्येला न्याय मिळावा हेच आपले ध्येय आहे, असे त्यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या या आश्वासनावर चहूकडून टीका झाल्यामुळेच त्यांनी आता भूमिका सौम्य करण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे.

Advertisement

भारतात वारसा कर नाही

Advertisement

? पैतृक संपत्तीवर भारतात कर नाही. ही संपत्ती जेव्हा मृत व्यक्तीच्या वारसांना नियमानुसार मिळते, त्यावेळी त्यांना या संपत्तीवर कर द्यावा लागत नाही. पण अमेरिका, जपान इत्यादी देशांमध्ये असा कर आहे. तो संपत्तीच्या प्रमाणात आकारला जातो. पण प्रत्येकाला द्यावा लागतो. म्हणजेच एखाद्या गरीबाची जी काही संपत्ती असेल ती त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसांना मिळणार असेल तर या संपत्तीवरही काही प्रमाणात कर देणे काही देशांमध्ये अनिवार्य आहे.

? भारतात पाच दशकांपूर्वी असा कर होता. वारसांना मिळणाऱ्या पैतृक संपत्तीवर 85 टक्के कर भरण्याची तरतूद 1953 च्या कायद्यात होती. यातून पळवाट काढण्यासाठी ‘बेनामी“ मालमत्ता निर्माण करण्याकडे कल वाढू लागला होता. अखेर 1985 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला आणि पैतृक संपत्ती करातून मुक्त करण्यात आली. भारताप्रमाणेच रशिया, मकाव, पोर्तुगाल, स्लोवाकिया, स्वीडन, हाँगकाँग, हंगेरी, सिंगापूर आदी देशांमध्ये हा कर नाही.

Advertisement
Next Article