For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता श्रीलंकेतही फोन पे सुविधा सुरु

06:18 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता श्रीलंकेतही फोन पे सुविधा सुरु
Advertisement

कंपनीने लंका पे च्या मदतीने सुरु केली युपीआय सेवा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

भारतातील आघाडीच्या तृतीय पक्ष युपीआय अॅप्लिकेशन आधारित कंपनी ‘फोन पे’ने श्रीलंकेत आपली सेवा सुरू केली आहे. ‘फोन पे’ ने भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत ‘श्रीलंका पे’ सोबत भागीदारी केली आहे. फोन पे आणि लंका पे दरम्यान सुरू करण्यात आलेली युनिफाइड पेमेंट इंटरफेस सेवा भारतीय पर्यटकांना मोठी सुविधा देईल. त्याचबरोबर श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेलाही यामुळे आगामी काळात चालना मिळणार आहे.

Advertisement

 कोडद्वारे पेमेंट करता येईल

लॉन्चिंग प्रोग्राममध्ये, फोन पे ने सांगितले की श्रीलंकेला प्रवास करणारे त्यांचे अॅप वापरकर्ते लंका पे वर क्यूआर मर्चंट येथे युपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वापरून पेमेंट करू शकतात. वापरकर्ते कोणत्याही रोख किंवा चलन विनिमयाशिवाय लंका क्यूआर  कोड स्कॅन करून सुरक्षित आणि वेगवान पेमेंट करू शकतात.

भारतीय पर्यटकांना चालना मिळेल

दोन्ही देशांमधील या भागीदारी कार्यक्रमात भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेचे गव्हर्नर पी. नंदलाल वीरासिंघे आणि अनेक बँकिंग अधिकारी आणि पेमेंट सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लॉन्चिंग कार्यक्रमाला संबोधित करताना भारताचे उच्चायुक्त संतोष झा म्हणाले की, श्रीलंकेत प्रसिद्ध डिजिटल पेमेंट सिस्टम फोन पे सुरू झाल्यानंतर भारतातील पर्यटनाला चालना मिळेल.

Advertisement
Tags :

.