आता ‘पेटीएम फास्टॅग’ वापरता येणार नाही
टोल नाक्यावर केला जातो फास्टॅगचा वापर: एनएचएआयची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन फास्टॅग घ्यावा लागेल. कारण इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी (आयएचएमसीएल), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या संस्थेने पेटीएम पेमेंट बँक त्यांच्या नोंदणीकृत बँकांच्या यादीतून काढून टाकली आहे. म्हणजेच पेटीएम यापुढे नवीन फास्टॅग जारी करू शकणार नाही. आता तुम्हाला तुमचा पेटीएम फास्टॅग काढून टाकावा लागेल आणि यादीत दिलेल्या कोणत्याही बँकेतून नवीन फास्टॅग खरेदी करावा लागेल.
पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर आयएचएमसीएलने हे पाऊल उचलले आहे. सुमारे 2 कोटी वापरकर्ते प्रभावित होणार आहेत. आयएचएमसीएलने 32 बँकांची यादी जारी केली असून अधिकृत बँकांकडून फास्टॅग खरेदी करावे.
रिझर्व्ह बँकेने मुदत 15 दिवसांनी वाढवली
रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडच्या व्यवहारावर 29 फेब्रुवारीनंतर निर्बंध जारी केले होते. पण रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी याबाबत पेटीएमला आता मुदत वाढवून दिली आहे. ग्राहकांचा आणि व्यापाऱ्यांचा विचार करुन 15 मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे.