ईपीएफओ पासबुक दाव्यासाठी आता एकच पोर्टल
या अगोदर वेगवेगळ्या वेबसाईटना भेट द्यावी लागत होती
वृत्तसंस्था/ मुंबई
ईपीएफओचे देशात 2.7 कोटींहून अधिक सक्रिय सदस्य आहेत. या सदस्यांसाठी आता 3 मोठे बदल केले आहेत. पहिले म्हणजे ‘पासबुक लाइट’ लाँच करण्यात येणार आहे. दुसरीकडे नोकरी बदलणाऱ्यांसाठी ऑनलाइन ट्रान्सफर सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची सुविधा राहणार आहे. तिसरे, पीएफ काढण्याचे दावे जलद निकाली काढण्यासाठी क्लेम सेटलमेंट प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी या बदलांची माहिती दिली. आतापर्यंत पीएफ योगदान, पैसे काढणे आणि शिल्लक तपशील तपासण्यासाठी वेगळ्या पासबुक पोर्टलवर जावे लागत होते. पण आता पासबुक लाइटसह ईपीएफओच्या सदस्य पोर्टलवर सर्व काही उपलब्ध असेल. म्हणजेच, सर्व माहिती एकाच लॉगिनवरून उपलब्ध होणार आहे.
पीएफ दावे आता जलद निकाली
सध्या पीएफ हस्तांतरण, सेटलमेंट, अॅडव्हान्स किंवा रिफंड सारख्या ईपीएफओच्या कोणत्याही सेवेसाठी उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांची (आरपीएफसी/ऑफिसर-इनचार्ज) मंजुरी आवश्यक आहे. यामुळे सदस्यांच्या दाव्यांमध्ये विलंब होतो आणि प्रक्रिया वेळ वाढतो. ही प्रणाली सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी, ईपीएफओने हे अधिकार सहाय्यक पीएफ आयुक्त आणि कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना हस्तांतरित केले आहेत. परिणामी पीएफसंदर्भातले दावे आता लवकर निकाली लागण्याची शक्यता अधिक आहे.
तीन फायदे असतील
एकच लॉगिन: आता वेगवेगळे पोर्टल बदलण्याची आवश्यकता नाही.
विविध प्रक्रिया: योगदान, पैसे काढणे आणि शिल्लक यांचे साधे पुनरावलोकन.
कमी वेळ : जुन्या प्रणालींच्या तुलनेत वेगाने सेवा, विशेषत: गर्दीच्या वेळी. हे बदल तक्रारी कमी करण्यासाठी आणि पीएफ तपशीलांमध्ये सहज प्रवेश प्रदान करण्यासाठी होणार आहे.
पासबुक लाइटवर प्रवेश ?
तुमच्या विद्यमान क्रेडेन्शियल्ससह ईपीएफओ सदस्य पोर्टलवर लॉग इन करा. दुसऱ्या क्रमांकावरील ह्यू टॅबवर जा आणि पासबुक लाइटवर क्लिक करा. येथे नवीनतम 5 महिन्यांचे योगदान प्रदर्शित केले जाईल. तपशीलवार दृश्यासाठी तुम्हाला अजूनही पासबुक पोर्टलवर जावे लागेल.
अॅनेक्सर के ची ऑनलाइन प्रवेश काय?
हे एक हस्तांतरण प्रमाणपत्र आहे, जे ईपीएफओ नोकऱ्या बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जनरेट करते. हे दस्तऐवज जुन्या नियोक्त्याकडून नवीन नियोक्त्याकडे पीएफ खाते हस्तांतरित करण्याबद्दल माहिती प्रदान करते. पूर्वी हे विनंतीवर उपलब्ध होते.