मलेरियापासून आता डासच वाचविणार
वैज्ञानिकांकडून नवे संशोधन
मलेरिया म्हणजेच हिवताप हा डासांमुळे फैलावतो हे सर्वांनाच माहित असेल. परंतु हाच डास तुम्हाला मलेरियापासून वाचवू लागल्यास काय वाटेल? वैज्ञानिकांनी आता अशी वॅक्सीन तयार केली आहे, जी मच्छरांमध्ये सोडली जाऊ शकते. या वॅक्सीनने युक्त मच्छराने तुम्हाला चावल्यास मलेरिया होणार नाही तर त्यापासून बचाव होईल.
ही मलेरियाची सेकंड जनरेशन वॅक्सीन आहे. ज्याद्वारे उपचार करणे अत्यंत उपयुक्त दिसुन येत आहे. 9 लोकांवर या वॅक्सीनचे परीक्षण करण्यात आले असून यातील 8 जण मलेरियामुक्त आढळून आले आहेत. तर एकाला जुन्या जनरेशनची मलेरिया वॅक्सीन देण्यात आली होती.

या वॅक्सीनला नेदरलँड्सच्या रॅडबाउंड युनिव्हर्सिटी आणि लीडन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी मिळून तयार केले ओ. यात प्लासमोडियम फाल्सीपॅरम पॅरासाइटचा कमकुवत जेनेटिक वर्जन टाकण्यात आला आहे. या जीए2 वर्जन पॅरासाइटद्वारे मलेरिया होत नाही तर शरीरात त्यापासून इम्युनिटी तयार होते.
जीए2 पॅरासाइट स्वत:चा पहिला वर्जन म्हणजेच जीए1च्या ऐवजी लिवरमध्ये डेव्हलप होण्यास अत्यंत अधिक वेळ घतो. अशा स्थितीत लिव्हर याच्याशी लढणारी यंत्रणा सक्रीय करते, मग मलेरिया होण्याची शक्यताच मावळून जाते. पॅरासाइटला मच्छरांमध्ये देखील सोडले जाऊ शकते. हे मच्छर जेव्हा माणसांना चावतील तेव्हा हे पॅरासाइट माणसांच्या शरीरात पोहोचतात, यामुळे माणसांचा मलेरियापासून बचाव होतो असे उद्गार वॅक्सिनोलॉजिस्ट मेटा रोएस्टेनबर्ग यांनी काढले आहेत.
या पॅरासाइटची जेनेटिक डेव्हलपमेंट रोखण्यात आली आहे, याचमुळे तो मानवी रक्ताद्वारे लिव्हरपर्यंत जात आजार निर्माण करू शकत नाही. सध्या हा प्रयोग काही काळासाठी माणसांना मलेरियापासून वाचवितो. भविष्यात याला आणखी शक्तिशाली करण्याची तयारी सुरू आहे.
जीए2 वॅक्सीन मानवी इम्युन सिस्टीमला अधिक सक्रीय करतो, याचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहतो. परंतु अनेक महिन्यांपर्यंत राहत नाही. याचे काही छोटे साइड इफेक्ट्स देखील आहेत. जीए2 वॅक्सीनयुक्त डास जेव्हा माणसाला चावेल, तेव्हा चावलेल्या ठिकाणी लाल चट्टा तयार होईल, खाज सुटेल, परंतु काही काळच. दरवर्षी सुमारे 25 कोटी लोक मलेरियामुळे आजारी पडतात, तर हजारो लोकांचा मृत्यू देखील होत असतो.
सद्यकाळात जी वॅक्सीन आहे, ती वर्तमान लोकसंख्येच्या केवळ 50-77 टक्के हिस्स्यालाच सुरक्षित ठेवू शकते. हा काळ देखील एक वर्षापेक्षा अधिक नसतो. याचमुळे आता मच्छरांच्या डंखालाच मलेरिया व्हॅक्सनची सुई करण्याची तयारी सुरू आहे.