Satara News : पाटण तहसील परिसरात आता 'नो पार्किंग' फलक
पाटण तहसील कार्यालयात पार्किंगची नवीन व्यवस्था
नवारस्ता : पाटण तहसील कार्यालय परिसरात वाहनांच्या पार्किंग असुविधेबाबत माध्यमांनी उठविलेल्या आवाजाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने आवारातील अस्ताव्यस्त लावण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पट्टे मारून एका रेषेत पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पाटण तहसील कार्यालय परिसरात विविधा कामानिमित्त दुचाकी व इतर वाहने घेऊन येणाऱ्यांची मोठी आहे. मात्र या परिसरात अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जातात. तासन् तास उभा असणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. परिणामी वाहनधारकांना वाहने काढताना आणि नागरिकांना या वाहनांमधून वाट काढताना दमछाक व्हायची.
या संदर्भात माध्यमांनी अनेक वेळा आवाज उठवून पार्किंग सुविधा करण्याची मागणी केली. तहसीलदार अनंत गुरव यांनी याची गांभीर्यान दखल घेतली. कार्यालय आवारात पट्टे मारून, 'नो पार्किंग' बोर्ड, तसेच बॅरिकेटस् उभे करून एका रेषेत पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम पाटण उत्तरचे उपअभियंता एस. वाय. शिंदे यांचेही सहकार्य मिळाले.