For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता नेपाळमध्ये एमडीएच-एव्हरेस्ट मसाल्यावर बंदी

06:39 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता नेपाळमध्ये एमडीएच एव्हरेस्ट मसाल्यावर बंदी
Advertisement

सिंगापूर-हाँगकाँगनेही घातली होती बंदी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

सिंगापूर आणि हाँगकाँग पाठोपाठ आता नेपाळमध्येही भारतामधील दोन मसाला ब्रँड यामध्ये एक एव्हरेस्ट आणि दुसरा एमडीएच यांच्यावर विक्री आणि खरेदी तसेच आयात यांच्यावर बंदी घातली आहे. यापाठोपाठ नेपाळमध्येही अन्न तंत्रज्ञान व गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ता मोहन कृष्ण महाजन यांनी म्हटले की, नेपाळमध्ये आता एव्हरेस्ट आणि एमडीएच ब्रँडच्या मसाल्याच्या आयातीवर बंदी घातली आहे.

Advertisement

मसाल्यामध्ये आरोग्याला हानिकारक अंश सापडल्याच्या माहितीमुळे एक आठवडा अगोदरच आयातीवर बंदी घातली असून या मसाल्याच्या विक्रीवरही बंदी लागू करण्यात आल्याची माहिती आहे. कारण या दोन्ही ब्रँडच्या मसाल्याची केमिकल तपासणी करण्यात येत असून अंतिम अहवाल येईपर्यंत ही बंदी लागू होण्याची माहिती आहे.

काय म्हणाले वाणिज्य मंत्रालय

भारतीय मसाल्यांवर बंदी घालण्याच्या घटना या क्वचितच कुठेतरी घडल्या आहेत. निर्यातीच्या दरम्यान सँपलसाठी देण्यात आलेले मसाले व प्रत्यक्ष निर्यात होणार मसाले यामध्ये तफावत राहत असल्याचेही वाणिज्य मंत्रालयाने यावेळी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.