For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता गोवा ते अयोध्या विमान

12:06 PM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
आता गोवा ते अयोध्या विमान
Advertisement

एअर इंडियाची घोषणा : 31 डिसेंबरला पहिले विमान

Advertisement

पणजी : गोव्यातून अयोध्येला जाण्यासाठी चालू 2023 वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर रोजी पहिले विमान झेपावणार असून एअर इंडियातर्फे सदर विमानसेवेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्यातून थेट अयोध्येला जाण्याची सोय गोमंतकीय जनतेला उपलब्ध झाली आहे. गोवा ते अयोध्या उ•ाणासाठी एकेरी मार्गाचे प्रवासी भाडे रु. 6000 ते 9000 पर्यंतच्या आसपास राहणार आहे. परंतु परत तेथून गोव्यात येण्यासाठी मात्र दुपटीने म्हणजे रु. 20,000 च्या आसपास भाडे द्यावे लागणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार असून त्या पार्श्वभूमीवर अयोध्येचा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार आहे. तेथून देशातील सर्व प्रमुख शहरांशी सेवा सुरू करण्यासाठी एअर इंडियाने तत्परता दाखवली असून इतर विमान कंपन्यादेखील अयोध्येसाठी सेवा देण्याच्या तयारीत आहेत. अधिक तपशील मागाहून जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अयोध्या राम मंदिरासाठी प्रसिद्ध असून तेथे होणाऱ्या नवीन राम मंदिरासाठी देशभरातील यात्रेकरू, भक्तमंडळी उत्सुक आहेत. त्यांची सोय व्हावी म्हणून एअर इंडियाने विमान सेवा देण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती प्रवक्त्याने दिली. गोव्यासह बंगलोर, कोची, गुवाहाटी, ग्वाल्हेर, जयपूर, पुणे, मुंबई, श्रीनगर, सुरत व परदेशातही अध्योध्येस जोडणारी थेट सेवा सुरू होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.