आता सांगलीतही जीबी सिंड्रोमचा शिरकाव
सांगली जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले
सांगली
सांगली जिल्हात 'जीबी सिंड्रोम' चा शिरकाव झाला असून. सहा रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
सांगली जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये जी. बी. सिंड्रोमचे रुग्ण पुणे, मुंबई सह अनेक ठिकाणी आढळले आहे. सध्या सांगली जिल्ह्यात सहा जण जी बी सिंड्रोमचे संशयित रुग्ण म्हणून आढळले आहेत. यापैकी चार जणांना क्लिनिकली याची लागण झाली आहे. तर त्यापैकी दोन रुग्णांच्या बाबतीत अजूनही शाशंकता आहे. हे सहा रुग्ण प्रायव्हेट हॉस्पीटल मध्ये उपचार घेत असून, शासकिय रुग्णालयात एकही रुग्ण उपचाराखातर दाखल करण्यात आलेला नाही. सहा पैकी दोन ग्रामीण भागातील, दोन शहरी भागातील, एक महापालिकेच्या अखत्यारित तर एक शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. सर्व रुग्णांची परिस्थिती चांगली आहे. याबद्दल सर्व आरोग्य केंद्रांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. प्रशासन सज्ज आहे.