आता वर्षासाठी ‘चॅटजीपीटी गो’चा मोफत अॅक्सेस
4 नोव्हेंबरपासून मर्यादित कालावधीसाठी प्रमोशनल कालावधी सुरु होणार
नवी दिल्ली :
ओपन एआयने मंगळवारी जाहीर केले आहे की, आता ते भारतातील वापरकर्त्यांना एका वर्षासाठी ‘चॅटजीपीटी गो’ चा मोफत अॅक्सेस देणार आहे. ही सवलत 4 नोव्हेंबरपासून मर्यादित काळासाठी प्रमोशनल कालावधीत सुरू होणार आहे. चॅटजीपीटी गो ही अमेरिकन एआय कंपनी ओपनएआयची नवीन सबक्रिप्शन टियर आहे, जी उच्च क्वेरी मर्यादा, इमेज जनरेशन आणि फाइल अपलोड सारखी प्रगत वैशिष्ट्यो देते. ही योजना विशेषत: भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी लाँच करण्यात आली आहे, जिथे चॅटजीपीटीचा वापरकर्ते वेगाने वाढत आहेत.कंपनीने म्हटले आहे की 4 नोव्हेंबर रोजी बेंगळूरू येथे होणाऱ्या ओपन एआय एक्सचेंज कार्यक्रमात भारतात साइन अप करणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना एक वर्षासाठी चॅटजीपीटी गो मोफत मिळेल. या वर्षी ऑगस्टमध्ये भारतात चॅटजीपीटी गो लाँच करण्यात आले. ओपन एआय नुसार, लाँच होण्याच्या आधीच्या महिन्यात पेड सबक्राइबरची संख्या दुप्पट झाली. प्रचंड मागणीमुळे, कंपनीने आता जवळजवळ 90 देशांमध्ये चॅटजीपीटी गो उपलब्ध करून दिले आहे. हे पाऊल कंपनीच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाला बळकटी देते आणि भारत सरकारच्या इंडियाएआय मिशनला समर्थन देते, असे ओपनएआयने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीचे उद्दिष्ट भारतात एआय तंत्रज्ञानाचा अधिक व्यापकपणे अवलंब करणे आहे, विशेषत: जेव्हा देश पुढील वर्षी एआय इम्पॅक्ट समिट आयोजित करण्याची तयारी करत आहे.
डेव्हलपर्स आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढती लोकप्रियता
भारतातील लाखो लोक दररोज चॅटजीपीटी वापरत आहेत, ज्यात डेव्हलपर्स, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. ते ओपनएआयच्या प्रगत साधनांचा वापर करून शिकण्याची आणि काम करण्याची दक्षता वाढवत आहेत. ओपनएआयचे उपाध्यक्ष आणि चॅटजीपीटीचे प्रमुख निक टर्ली म्हणाले की, भारतात चॅटजीपीटी गो लाँच झाल्यापासून आपण पाहिलेली सर्जनशीलता आणि अवलंब खूप उत्साहवर्धक आहे. पहिल्या देवडे एक्सचेंज कार्यक्रमाच्या एक वर्ष आधी कंपनी संपूर्ण भारतात ते मोफत उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना एआयच्या शक्तीचा फायदा घेता येईल.