For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता श्वानही करणार राइट स्वॅप

06:33 AM Aug 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आता श्वानही करणार राइट स्वॅप
Advertisement

सध्याच्या काळात जोडीदाराचा शोध डेटिंग अॅपवर अधिक निर्भर झाला आहे. परंतु आता केवळ माणूसच नव्हे तर श्वानांचाही डेटिंग अॅप आला आहे. या अॅपवर श्वान स्वत:चे मित्र आणि जोडीदार शोधत आहे. हे विदेशात नव्हे तर भारतात घडत आहे.

Advertisement

श्वानांसाठी डेटिंग अॅप

या अॅपचे नाव डोफेयर असून तो शहरी भारतात श्वानांसाठी साथीदार शोधण्यास मदत करतो. शहरी जीवनमानात माणसांप्रमाणे प्राण्यांकडेही मिळण्याजुळण्याचा वेळ नसतो, असे डोफेयरचे संस्थापक मौर्य कंपेली यांनी म्हटले आहे. डोफेयरच्या टीमने डॉक्टर्स, पेट पॅरेंट्स आणि ग्रुमर्सशी संवाद साधला असता अनेक श्वान एकटेपणामुळे मानसिक तणाव, कंटाळा आणि चुकीच्या वर्तनासारख्या समस्यांना सामोरे जात असल्याचे कळले. केवळ खेळण्याची किंवा मेटिंगची बाब नसून इमोशनल वेल-बीइंगची गरज असल्याचे आम्हाला कळते. श्वानांनाही आमच्याप्रमाणे मिसळण्याची गरज असते, परंतु असे कुठलेच व्यासपीठ नव्हते असे मौर्य यांनी म्हटले आहे.

Advertisement

मैत्री, खेळ अन् साथ

याच विचाराने डोफेयरची सुरुवात झाली. हे केवळ डेटिंग अॅप नसून पेट पॅरेंट्स, स्थानिक पेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि वेटनरी डॉक्टर्सनाही जोडते. अॅपचे वापरकर्ते आता वाढत असून सोशल मीडियावर पेट इव्हेंट्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

प्रोफाइलद्वारे श्वानांचे मॅचिंग

या अॅपवर पेट पॅरेट्स श्वानाची प्रोफाइल तयार करू शकतात, ज्यात त्यांची प्रजाती, एनर्जी लेव्हल, स्वभाव आणि पसंत इत्यादी माहिती असते. मग याच तपशीलाच्या आधारावर इतर श्वानांशी मॅचिंग केले जाते. यूजर लोकेशन, वर्तन आणि पसंतीच्या आधरावर फिल्टर लावता येतो आणि प्लेडेट प्लॅन करू शकता.

सुरक्षा अन् इथिकल ब्रीडिंग

अॅपवर सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मोबाइल नंबर पडताळणी आवश्यक असून वापरकर्त्याला व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट आणि श्वानाचे छायाचित्र अपलोड करावे लागते. जर प्रोफाइल संशयास्पद वाटल्यास त्वरित कारवाई होते. डॉक्टर्स आणि पेट प्रोफेशनल्ससोबत मिळून इथिकल ब्रीडिंगसाठी जागरुकता निर्माण करत आहोत, असे मौर्य यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.